Kolhapur: उत्तूरमधील ऊस पिके करपली, शेतकरी चिंताग्रस्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 06:15 PM2023-04-25T18:15:52+5:302023-04-25T18:16:10+5:30

उत्कर्षा पोतदार  उत्तूर: उन्हाळ्यात दरवर्षी पडणारा वळीव पाऊस उत्तूरला अजूनही न पडल्याने ऊस पिके करपू लागली आहेत. शेतकरी पाण्याची ...

Sugarcane crops failed in Uttur Kolhapur, farmers worried | Kolhapur: उत्तूरमधील ऊस पिके करपली, शेतकरी चिंताग्रस्त 

Kolhapur: उत्तूरमधील ऊस पिके करपली, शेतकरी चिंताग्रस्त 

googlenewsNext

उत्कर्षा पोतदार 

उत्तूर: उन्हाळ्यात दरवर्षी पडणारा वळीव पाऊस उत्तूरला अजूनही न पडल्याने ऊस पिके करपू लागली आहेत. शेतकरी पाण्याची उसनवारी करून ऊस पिक जगवण्यासाठी धडपडत आहेत. आजूबाजूच्या गावात वळीव पाऊस झाला असला तरी उत्तूरला वळीव पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात वळीव पाऊस  झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस पिक घेतले. विहिरी व कुपनलिकेचे अपुरे पाणी असले तरी वळीव पावसाच्या जोरावर ऊस पिक चांगले आले होते. यावर्षी मात्र वळीव पावसाने पाठ फिरवल्याने ऊसकरी शेतकरी त्रस्त झाले आहेत. चार दिवस दिवसपाळी व तीन दिवस रात्रपाळी असा शेतीसाठीचा वीजपुरवठा असल्याने ऊसाला पाणी देण्यात देखील शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. 

कुपनलिकेतील पाण्याची पातळीही उष्णतेने खाली जात आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने जमिनीला भेगा पडले आहेत. त्यामुळे संपूर्ण पिकाला पाणी देणे अशक्य होऊन बसले आहे. शेतकरी वळीव पाऊस कधी पडेल याकडे डोळे लावून बसले आहेत. सायंकाळी ढगाळ वातावरण होते. काही वेळेला विजांचा कडकडाट होतो. मात्र प्रत्यक्षात पाऊस पडत नाही. परिणामी यावर्षी उत्तूर  परिसरातील ऊस उत्पादन घटल्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

सूर्यकिरणांची तीव्रता वाढलेल्या उष्णतेमुळे ऊस पिकाला भरपूर पाण्याची आवश्यकता आहे. वळीव पाऊस नसल्याने उसाने काही ठिकाणी मान टाकली आहे. शेजारच्या उपनलिकेचे पाणी उसणवारीने घेऊन पीक जगवण्याची धडपड सुरू आहे. - सुरेश कुंभार- शेतकरी
 

आजरा, गडहिंग्लज व गारगोटी अशा उत्तुरच्या सभोवतीच्या गावात वळीव पाऊस झाला. मात्र उत्तुरला अजिबात पाऊस झालेला नाही. त्यामुळे ऊस पिक वाचवणे जिकरीचे झाले आहे. अजूनही पावसाला दीड दोन महिने असल्याने ऊस पीकासाठी पाणी कुठून आणणार अशी अडचण आहे. - आयेशा ढालाईत  - शेतकरी

Web Title: Sugarcane crops failed in Uttur Kolhapur, farmers worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.