शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

साखरेने गाठली नीचांकी, दर २७०० रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 05:26 IST

घाऊक बाजारातील साखरेच्या दरातील घसरण चालूच असून, मंगळवारी २७०० रुपये प्रतिक्विंटल असे दर होते. गेल्या दीड वर्षातील हा दराचा नीचांक आहे.

- चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : घाऊक बाजारातील साखरेच्या दरातील घसरण चालूच असून, मंगळवारी २७०० रुपये प्रतिक्विंटल असे दर होते. गेल्या दीड वर्षातील हा दराचा नीचांक आहे. यामुळे साखर कारखान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनेही निर्यात साखरेवर शेतकऱ्यांना प्रतिटन ५५ रुपये अनुदान देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.देशात यंदा २९५ लाख टन साखरेचे उत्पादन होईल असाअंदाज आहे. देशांतर्गत मागणीपेक्षा ते सुमारे ४५ लाख टन जादा आहे. या अतिरिक्त साखरेच्या दबावामुळे हंगामाच्या सुरुवातीला घाऊक बाजारातील दर ३५०० रुपये प्रतिक्विंटल होता. आता तो आजघडीला २७०० रुपयांवर आला आहे. साखरेचे दर वाढावेत यासाठी केंद्र सरकारनेही साखरेवरील आयात कर १०० टक्के केला आहे. तसेच साखर कारखान्यांना २० लाखटन साखर निर्यातीची परवानगीदिली आहे. तथापि, आंतरराष्टÑीय बाजारातील साखरेचे दरही कोसळलेले आहेत. मंगळवारी निर्यातीचे दर २००० ते २०५० रुपये प्रतिक्विंटल होते. या दराने कारखान्यांना साखर निर्यात करणे तोट्याचे आहे.>साखर मूल्यांकन २८०० रुपयांवरदरातील घसरणीमुळे राज्य सहकारी बॅँकेनेही गेल्या १० दिवसांत साखरेचे मूल्यांकन प्रतिक्विंटल ३०० रुपयांनी कमी केले आहे. मंगळवारी ते आणखी कमी करत २८०० रुपये प्रतिक्विंटलवर आणले आहे. यामुळे कारखाने शॉर्टमार्जिनमध्ये आले आहेत.अनुदान थेट शेतकºयांनाकारखान्यांना थेट अनुदान देणे जागतिक व्यापार संघटनेच्या कराराचे उल्लंघन ठरू शकते. त्यामुळे साखरेवर थेट अनुदान न देता प्रत्येक कारखान्याकडून गाळप होणाºया साखरेवर प्रतिटन ५५ रुपये अनुदान थेट संबंधित ऊस उत्पादक शेतकºयांच्या खात्यावर जमा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.>साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळेच बाजारातील दर घसरत आहेत. त्यामुळे प्रसंगी तोटा सहन करून कारखान्यांनी साखर निर्यात केली पाहिजे, तरच देशातील साखरेचे दर वाढू शकतील आणि आता होणारा तोटा दरवाढीनंतर कारखान्यांना भरून काढता येईल.- विजय औताडे, साखर उद्योग तज्ज्ञ