शहरं
Join us  
Trending Stories
1
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
3
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
4
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
5
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
6
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
7
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
8
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
9
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
10
काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे
11
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
12
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
13
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
14
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
15
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
16
तुम्ही दुबार मतदार असाल तर सादर करावे लागणार २ पुरावे; मतदान केंद्रावर हमीपत्र लिहून घेतले जाणार
17
अंबरनाथ, बदलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवकपदावरून वादाची ठिणगी; शिंदेसेनेचे पारडे झाले जड
18
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
19
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
20
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत महाविद्यालयांना अचानक सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 10:27 IST

Shivaji University, exam, Student, Education Sector, kolhapur पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या सत्र चार व पाचमधील बॅकलॉग (अनुशेष) विद्यार्थ्यांच्या परीक्षा आज, मंगळवारपासून महाविद्यालय पातळीवर आयोजित करण्याबाबतच्या सूचना शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने सोमवारी सायंकाळी अचानकपणे दिल्या. त्यामुळे अनेक प्राचार्य, प्राध्यापकांसमोर या परीक्षेची तयारी कशी करायची, विद्यार्थ्यांना माहिती कशी द्यावयाची, असा प्रश्न उभारला.

ठळक मुद्देबॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत महाविद्यालयांना अचानक सूचना विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचा सावळा-गोंधळ : प्राचार्य, प्राध्यापकांसमोर प्रश्न

कोल्हापूर : पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या सत्र चार व पाचमधील बॅकलॉग (अनुशेष) विद्यार्थ्यांच्या परीक्षा आज, मंगळवारपासून महाविद्यालय पातळीवर आयोजित करण्याबाबतच्या सूचना शिवाजी विद्यापीठाच्यापरीक्षा व मूल्यमापन मंडळाने सोमवारी सायंकाळी अचानकपणे दिल्या. त्यामुळे अनेक प्राचार्य, प्राध्यापकांसमोर या परीक्षेची तयारी कशी करायची, विद्यार्थ्यांना माहिती कशी द्यावयाची, असा प्रश्न उभारला.ऑक्टोबरमध्ये विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेला राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, कोविड-१९ चा प्रादुर्भाव, गैरहजर अथवा तांत्रिक कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट होता आले नाही. अशा विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षा आयोजनाचा निर्णय विद्यापीठाने घेतला. अंतिम वर्षास प्रवेशित असलेल्या आणि बॅकलॉग असलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या बॅकलॉगअंतर्गत लेखी पुनर्परीक्षा दि. १५ ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये घेण्याचा निर्णय विद्यापीठाने दि. ७ डिसेंबरला घेतला. त्यानंतर या परीक्षा महाविद्यालय अथवा अधिविभागांच्या पातळीवर सुयोग्य ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आयोजित कराव्यात.

विषम सत्राच्या परीक्षा घेण्याबाबत निश्चित केलेल्या धोरणांनुसार समन्वयक अथवा अग्रणी महाविद्यालय किंवा विद्यापीठातील अधिविभागांच्यास्तरावर या परीक्षा घेण्यात याव्यात, अशी सूचना परीक्षा मंडळाने दि. ९ डिसेंबरला परिपत्रकाव्दारे अधिविभागप्रमुख, महाविद्यालयांच्या प्राचार्यांना केली.

त्यानुसार महाविद्यालयांनी सत्र एक, तीन आणि पाच या विषम सत्रांतील बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा या अग्रणीव्दारे घेण्याची तयारी सुरू केली. मात्र, त्यातच सत्र चारच्या लेखी पुनर्परीक्षा अग्रणी अथवा समन्वयक महाविद्यालयांऐवजी शैक्षणिक संस्था किंवा महाविद्यालयस्तरावर आयोजित करण्यात याव्यात, अशी सूचना परीक्षा मंडळाने सोमवारी केली

सत्र चार आणि पाचमधील बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना यापूर्वी परीक्षा देण्याची संधी दिली होती. त्यातही काही कारणास्तव जे विद्यार्थी गैरहजर असतील. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठाने त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांची परीक्षा ही महाविद्यालय अथवा शैक्षणिक संस्थांच्या स्तरावर आयोजित केली आहे.- ग्गजानन पळसे, प्रभारी संचालक, परीक्षा मंडळ

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठexamपरीक्षाStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर