शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- अजित पवार यांचे ‘उत्तरदायित्व’, रस्ते अडवून का? नागरिकांमधून विचारला जातोय प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 12:52 IST

वाहतुकीत अडथळे कशासाठी

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रविवारी तपोवन मैदानावर होणाऱ्या ‘उत्तरदायित्व’ सभेची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. कळंबा रोडवरील आयटीआयपासूनच स्वागत कमानी उभारल्या जात आहेत. रस्त्याच्या दुतर्फा पूर्णपणे बंद केले जाणार आहे. त्यामुळे त्यांचे उत्तरदायित्व रस्ते अडवून कशासाठी, असा प्रश्न त्या परिसरातील लोकांकडून विचारला जात आहे.लोकमतकडे त्यासंबंधीच्या तक्रारी लोकांनी फोन करून केल्या. हा कोल्हापूर-गारगोटी राज्य महामार्ग आहे. त्यामुळे वाहनांची सतत वर्दळ असते. असे असताना मोठमोठ्या कमानी उभारून वाहतुकीत अडथळे कशासाठी, अशी लोकांची विचारणा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात सभेचा झंजावात सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटानेही महाराष्ट्रात सभा घेण्यास सुरुवात केली असून बीडमध्ये त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते.कोल्हापुरात अजित पवार यांचा नागरी सत्कार व ‘उत्तरदायित्व’ सभेचे आयोजन रविवारी दुपारी चार वाजता तपोवन मैदानावर केले आहे. त्याची तयारी गेली आठ दिवस तालुकापातळीवर सुरू आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे कागलसह इतर तालुक्यांत सभा घेत आहेत. जिल्हाभर स्वागताचे डिजिटल फलक लावले असून त्यातून वातावरण निर्मिती केली जात आहे.

लाखाची गर्दी, नाश्ता, जेवणही

सभेला एक लाखाची गर्दी जमवण्याचा प्रयत्न संयोजकांकडून आहे. त्यादृष्टीने तालुक्यांतील नेत्यांवर जबाबदारी दिली असून गाड्यांसह नाश्ता, जेवणाचीही सोय केली आहे. ॲल्युमिनियमचा सांगाडा असलेला मंडप उभारण्यात येत आहे. शासन आपल्या दारी मेळाव्यालाही एक कोटी खर्चून असाच मंडप उभारण्यात आला होता.

ताराराणी चौकातून मिरवणूकउपमुख्यमंत्री पवार यांची ताराराणी चौकातून मिरवणूक काढली जाणार आहे. ही मिरवणूक दसरा चौक व शाहू समाधिस्थळाला भेट देऊन अभिवादन केल्यानंतर छत्रपती शिवाजी पुतळा, अंबाबाई दर्शन करून बिंदू चौक, मिरजकर तिकटीमार्गे तपोवन मैदानाकडे मिरवणूक जाणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस