शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

कोरोनाबाधित रुग्णावर सीपीआरमध्ये आतड्याची यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 18:55 IST

पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील एका तरुणाचा जीव धोक्यात आला होता. अनेक खासगी रुग्णालयांत उपचारासाठी प्रयत्न केले, मात्र सगळ्यांनी दारातूनच परत पाठविले. मात्र सीपीआरच्या टीमने या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया करत त्याचे प्राण वाचविले.

ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्णावर सीपीआरमध्ये आतड्याची यशस्वी शस्त्रक्रियापट्टणकोडोलीतील युवक : पत्नीने मानले सीपीआर प्रशासनाचे आभार

कोल्हापूर : चाकू लागल्याने आतड्याला गंभीर जखम झाली होती, त्यात कोरोनाची लागण झाल्याने पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील एका तरुणाचा जीव धोक्यात आला होता. अनेक खासगी रुग्णालयांत उपचारासाठी प्रयत्न केले, मात्र सगळ्यांनी दारातूनच परत पाठविले. मात्र सीपीआरच्या टीमने या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया करत त्याचे प्राण वाचविले. याबद्दल त्याच्या पत्नीने सीपीआर प्रशासनाचे पत्र लिहून आभार मानले.या तरुणाला चाकू लागल्यानंतर त्याच्या आतड्याला गंभीर इजा झाल्याने तत्काळ ऑपरेशनची गरज होती. त्यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापूर शहरातील अनेक खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दोन दिवस धडपड केली. मात्र, संबंधिताची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने कोणीही उपचार केले नाहीत.

वेळेत उपचार होत नसल्याने रुग्णाची प्रकृती ढासळत चाचली. अखेर कुटुंबीयांनी सीपीआरमध्ये दाखल केले. येथे त्यांना डॉ. अनमोल भेटले. त्यांनी रुग्णाची अवस्था पाहून तातडीने यंत्रणा हलवली आणि रात्री बारा वाजता ऑपरेशनसाठी घेतले.

ऑपरेशन यशस्वी झालेच, त्याचबरोबर तो तरुण कोरोनामुक्तही झाला. यामध्ये डॉ. अनमोल, डॉ. वसंत देशमुख, डॉ. शिवप्रसाद हिरूगडे, डॉ. कौतुक मेंच, डॉ. रसिम मुल्ला, डॉ. दीपक जायस्वाल, डॉ. प्रसन्ना शिंदे, डॉ. पृथ्वीराज, डॉ. निरद यांनी प्रयत्न केले.कोणी नाही, त्याच्यासाठी थोरला दवाखानाकोरोनाच्या महामारीत रुग्णांवर वेळेत उपचार होत नसल्याने मृत्यूची संख्या वाढत आहे. सामान्य माणसाला खासगी रुग्णालयात जाणे मुश्कील बनले आहे. गोरगरिबांसाठी कोणी वाली आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एरव्ही गोरगरिबांचा आधारवड ठरलेला थोरला दवाखाना कोरोनाच्या महामारीतही तितक्याच आपुलकीने काम करत आहे.

माझे पती गंभीर होते, त्यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया होणे गरजेचे असताना कोणी दारात उभे करून घेतले नाही. अशा परिस्थित सीपीआर रुग्णालयातील डॉक्टर माझ्यासाठी देव बनून मदतीला आले आणि पतीचे प्राण वाचले.- रुग्णाची पत्नी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर