राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत ‘प्रभंजन’चे यश

By Admin | Updated: February 6, 2015 00:41 IST2015-02-06T00:30:37+5:302015-02-06T00:41:27+5:30

प्रणिता कोळी हिने ग्वाल्हेर येथे नुकत्याच झालेल्या आंतरविद्यापीठ मल्लखांब स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ संघाकडून प्रतिनिधित्व करताना सांघिक सुवर्णपदक पटकावले

The success of 'Prabhjang' in the National Mallakhamb Championship | राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत ‘प्रभंजन’चे यश

राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत ‘प्रभंजन’चे यश

कोल्हापूर : सांगली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय मल्लखांब व महाराष्ट्र राज्य हौशी मल्लखांब ज्युनिअर व सीनिअर स्पर्धेत प्रभंजन व्यायाम मंदिरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले. सांगली येथील राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत संस्थेच्या सुशांत पाटील याने सांघिक सुवर्णपदक पटकावले, तर महाराष्ट्र राज्य हौशी मल्लखांब ज्युनिअर व सीनिअर स्पर्धेत दोरीचा झुलता व पुरलेला मल्लखांब स्पर्धेत व्यायामशाळेच्या शिरीन शेख, श्वेता शिंदे, सुशांत पाटील, समर्थ कोळी, प्रणिता कोळी, कानिफनाथ पाटील यांनी विविध मल्लखांब स्पर्धांमध्ये यश मिळविले. प्रणिता कोळी हिने ग्वाल्हेर येथे नुकत्याच झालेल्या आंतरविद्यापीठ मल्लखांब स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ संघाकडून प्रतिनिधित्व करताना सांघिक सुवर्णपदक पटकावले. या यशस्वी खेळाडूंना गुरुशांत हिरेमठ, डॉ. रेवती मोरे, सागर हिरेमठ, चंद्रकांत पाटील, धनश्री खेडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)

Web Title: The success of 'Prabhjang' in the National Mallakhamb Championship