सीए फाऊंडेशन परीक्षेत डीवायपी ज्युनिअर कॉलेजचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:04 IST2021-02-20T05:04:52+5:302021-02-20T05:04:52+5:30

डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या ५ विद्यार्थ्यांनी सी. ए. फाऊंडेशन परीक्षेत यश मिळवले आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या ...

Success of DYP Junior College in CA Foundation Exam | सीए फाऊंडेशन परीक्षेत डीवायपी ज्युनिअर कॉलेजचे यश

सीए फाऊंडेशन परीक्षेत डीवायपी ज्युनिअर कॉलेजचे यश

डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या ५ विद्यार्थ्यांनी सी. ए. फाऊंडेशन परीक्षेत यश मिळवले आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट (आयसीएसआय) तर्फे चार्टर्ड अकौंटंट अभ्यासक्रमासाठी ही फाऊंडेशन परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या नंदन गंभीर, रेणू हिंगे, सर्वेश जोशी, सुजय जाधव, केतकी पटेल या पाच विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. हे विद्यार्थी आता सी. ए. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास पात्र ठरले आहेत.

या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य ए. बी. पाटील व वाणिज्य विभागाच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी अभिनंदन केले.

फोटो: १८ डीवायपी सीए

Web Title: Success of DYP Junior College in CA Foundation Exam