SSC Result 2020 : ऑडिओच्या मदतीने त्या अंध विद्यार्थ्यांनी मिळविले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 08:10 PM2020-07-29T20:10:35+5:302020-07-29T20:17:42+5:30

राजोपाध्येनगर येथील अंधांनी अंध विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या अंध युवक मंचच्या वसतिगृहातील पाचही अंध विद्यार्थ्यांनी ब्रेल आणि ऑडिओच्या मदतीने इयत्ता दहावीच्या परिक्षेत लखलखीत यश मिळविले. संचारबंदीमध्ये कोल्हापूरात अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील दोन अंध विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. लोकमतच्या वृत्तामुळे त्यांना आपल्या घरी जाता आले.

Success achieved by those blind students with the help of audio | SSC Result 2020 : ऑडिओच्या मदतीने त्या अंध विद्यार्थ्यांनी मिळविले यश

SSC Result 2020 : ऑडिओच्या मदतीने त्या अंध विद्यार्थ्यांनी मिळविले यश

Next
ठळक मुद्देऑडिओच्या मदतीने त्या अंध विद्यार्थ्यांनी मिळविले यशदहावीच्या परिक्षेत शंभर टक्के निकाल : अंध युवक मंचच्या वसतिगृहाचे यश

कोल्हापूर : राजोपाध्येनगर येथील अंधांनी अंध विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या अंध युवक मंचच्या वसतिगृहातील पाचही अंध विद्यार्थ्यांनी ब्रेल आणि ऑडिओच्या मदतीने इयत्ता दहावीच्या परिक्षेत लखलखीत यश मिळविले. संचारबंदीमध्ये कोल्हापूरात अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील दोन अंध विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. लोकमतच्या वृत्तामुळे त्यांना आपल्या घरी जाता आले.

कोल्हापूरातील विकास विद्यामंदिर या शाळेत शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांनी ब्रेल आणि ऑडिओ स्वरुपात अभ्यास करुन सामान्य विद्यार्थ्यांसोबत परिक्षेला बसून हे यश मिळविले. लेखनिक म्हणून पद्मश्री ग. गो. जाधव शाळेच्या विद्यार्थ्यांनी पेपर लिहून सहकार्य केले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक भाटे, तसेच विकास विद्यामंदिरचे मुख्याध्यापिका के. जी. आवळे, विशेष शिक्षक अजय वणकुद्रे, अंध युवक मंचचे अध्यक्ष संजय ढेंगे, सुबराव शिंदे यांनी सहकार्य केले.

हिंगोली जिल्ह्यातील अतुल विश्वनाथ भगत याने ७१ टक्के तर कामिनी ज्ञानेश्वर गडवे हिने ६५ टक्के गुण मिळविले. मूळचे हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या कामिनीचे वडील शेतमजूर असून अतुलचे वडील मुंबईत रोजगार करतात. याशिवाय या वसतिगृहातील कोल्हापूर जिल्ह्यातील अमोल मोहन निकम याने ६४ तर हरिष दत्तात्रय सुकनपल्ली याने ६३ टक्के गुण मिळविले.

आमदार ऋतुराज पाटील यांनी केली होती मदत

तब्बल तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर संचारबंदीमध्ये कोल्हापूरात अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील या दोन अंध विद्यार्थ्यांची त्यांच्या घरच्यांची भेट झाली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेउन आमदार ऋतुराज पाटील आणि डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्नीकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या प्रयत्नांने या विद्यार्थ्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे सुखरुप पोहोचवण्यात आले होते. या मदतीमुळे त्यांनी आभार मानले आहेत.

Web Title: Success achieved by those blind students with the help of audio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.