शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

साखरेला प्रतिक्विंटल 150 रुपये अनुदान ? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 3:52 AM

राज्यातील साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि उपाय या विषयावर ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (ऐस्टा)चे अध्यक्ष प्रफुल विठलानी यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत सादरीकरण केले. त्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला. 

- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांना त्यांच्या साखर विक्री, पाठवणी आणि रेल्वे वाहतुकीच्या भाड्याच्या पावतीवर प्रतिक्विंटल १५० रुपये अनुदान देण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. याशिवाय साखरेचा किमान विक्री दर दुहेरी ठेवावा, तसेच गुजरातप्रमाणे उसाची एफआरपी तीन हप्त्यात देण्याची तरतूद करावी यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरण्यात येणार आहे. (Subsidy of Rs 150 per quintal to Sugar? Possibility of decision in state cabinet meeting)राज्यातील साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि उपाय या विषयावर ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (ऐस्टा)चे अध्यक्ष प्रफुल विठलानी यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत सादरीकरण केले. त्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला. देशात साखरेची सर्वाधिक मागणी उत्तर आणि ईशान्य भारतातील राज्यांकडून असते. उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांना वाहतुकीच्या दृष्टीने ही राज्ये जवळ असल्याने वाहतूक भाडे कमी होते. परिणामी तेथील साखर महाराष्ट्रातील साखरेपेक्षा स्वस्त पडते. त्यामुळे राज्यातील साखरेला मागणी कमी झाली आहे. राज्याच्या वाट्याला आलेल्या विक्री कोट्यापैकी ३० टक्के साखर विकलीच गेलेली नाही. प्रति क्विंटल २०० रुपये रेल्वे भाड्याच्या पावतीवर साखरेला अनुदान दिल्यास राज्यातील साखर कारखाने उत्तर प्रदेशातील कारखान्यांशी दराची स्पर्धा करू शकतील, असे विठलानी यांनी यावेळी सांगितले. सादरीकरणानंतर तिन्ही प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपस्थित मंत्र्यांनी सहमती दर्शविली.साखरेचा विक्री दर दुहेरी ठेवावाईशान्येकडील राज्यांचे अंतर उत्तर प्रदेशातील कारखान्यांना हजार ते १२०० किलोमीटर, तर महाराष्ट्रातील कारखान्यांना २१०० ते २२०० किलोमीटर पडते. यामुळे महाराष्ट्रातील कारखान्यांना सुमारे १००० किलोमीटरचे वाहतूक भाडे जादा द्यावे लागते. साखरेचा किमान विक्री दर मात्र देशभर एकच आहे. हे अंतर लक्षात घेऊन साखरेचा किमान विक्री दर उत्तर भारतातील कारखान्यांना प्रतिक्विंटल १०० रुपये जादा ठेवावा, असे मत विठलानी यांनी मांडले. त्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरण्याला बैठकीत मान्यता देण्यात आली. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार