Subhashnagar girl dies in flood waters | सुभाषनगरातील तरुणाचा पुराच्या पाण्यात मृत्यू
सुभाषनगरातील तरुणाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

ठळक मुद्देकामावरून घरी जात असताना गेला वाहून व्हीनस कॉर्नर जयंती नदीपात्रात मिळाला मृतदेह

कोल्हापूर : गेले सात दिवस बेपत्ता असलेल्या सुभाषनगरातील तरुणाचा व्हीनस कॉर्नर येथील जयंती नदीच्या पात्रात मृतदेह बुधवारी सकाळी सापडला. श्रीकांत राम साळे (वय ३४) असे त्यांचे नाव आहे. ८ आॅगस्टला शाहूपुरीतून कामावरून घरी येत असताना पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

श्रीकांत साळे हे शाहूपुरी येथील कुशनच्या दुकानात कामाला होते. नेहमीप्रमाणे ८ आॅगस्टला सकाळी ते कामावर गेले. रात्री नऊच्या सुमारास ते घरी येतात, त्या दिवशी ते आलेच नाहीत; त्यामुळे घरच्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची वर्दी दिली.

बुधवारी सकाळी व्हीनस कॉर्नर येथील जयंती नदीच्या पात्रात तरुणाचा मृतदेह मिळून आला. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. त्याच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. नातेवाइकांना फोन करून बोलवून घेतले असता, त्यांनी श्रीकांत साळे यांचा मृतदेह असल्याचे सांगितले.

रात्रीच्या वेळी कामावरून घरी येत असताना पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

 

 


Web Title: Subhashnagar girl dies in flood waters
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.