विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबच खेळाला महत्त्व द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST2021-09-12T04:28:48+5:302021-09-12T04:28:48+5:30

खोची : विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाला महत्त्व देऊन कला, क्रीडा, संस्कृती जोपासत आपली विशेष ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन ...

Students should give importance to sports along with studies | विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबच खेळाला महत्त्व द्यावे

विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबच खेळाला महत्त्व द्यावे

खोची : विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाला महत्त्व देऊन कला, क्रीडा, संस्कृती जोपासत आपली विशेष ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन गोविंदराव हायस्कूल व जुनि. कॉलेज इचलकरंजीचे माजी उपप्राचार्य अशोकराव दास यांनी केले.

नरंदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूलच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘स्व. शिवाजीराव देशमुखसो व्याख्यानमाला’ उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव देशमुख होते. विद्यालयाच्या नामफलकाचे अनावरण सरपंच रवींद्र अनुसे यांच्या हस्ते स्वागत सुरेश देवरमणी यांनी, तर सूत्रसंचालन सुस्मिता शिंदे यांनी केले. आभार एन. एम. पाटील यांनी मानले. कार्यक्रमास संस्था सेक्रेटरी नमिताताई देशमुख, मुख्याध्यापक बी. एस. खोत, पर्यवेक्षिका सुनंदा निकम यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Students should give importance to sports along with studies