स्पर्धेसमोरील आव्हाने पेलण्यास विद्यार्थ्यांनी सज्ज राहावे : लवटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 17:55 IST2019-09-26T17:54:29+5:302019-09-26T17:55:14+5:30
स्पर्धेसमोरील येणारी नवनवीन आव्हाने, बदलती परिस्थिती, नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी कष्ट घेण्याची आज खरी गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांनी केले.

कोल्हापुरातील रत्नाप्पा कुंभारनगर हायस्कूलमध्ये संस्थापक शंकरराव घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे. शेजारी नानासाहेब नष्टे, डॉ. सतीश घाळी, महादेव पोवार, राजू वाली, मकरंद कुलकर्णी, महादेव घुगरे, आदी उपस्थित होते.
कोल्हापूर : स्पर्धेसमोरील येणारी नवनवीन आव्हाने, बदलती परिस्थिती, नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी कष्ट घेण्याची आज खरी गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांनी केले.
महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटी व रत्नाप्पा कुंभारनगर हायस्कूलचे संस्थापक शंकरराव घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब नष्टे होते.
डॉ. लवटे म्हणाले, जिद्द, चिकाटी व ध्येय मनात ठेवूनच भविष्यात आपण कोठे जायचे आहे, त्याचा विचार विद्यार्थिदशेपासून करणे आवश्यक आहे. भरपूर वाचन करून संगणकाचे संपूर्ण ज्ञान घेण्याबरोबरचमाणूस म्हणून नाते जोडा व जगाला मोठे करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांनी स्वागत केले. सचिव डॉ. सतीश घाळी यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष महादेव पवार यांनी आभार मानले. विनायक कांबळे, जे. बी. शिंदे यांनी काव्यवाचन केले. याप्रसंगी शालेय समितीचे सदस्य मकरंद कुलकर्णी, बी. एम. महाजन, गुरुप्रसाद हिरेमठ, राजू वाली, महादेव घुगरे, अनिल सिंहासने, विकास श्रेष्ठी, आदी मान्यवर उपस्थित होते.