शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Navratri2022: पाठ्यपुस्तकाच्या रूपात अवतरली नवदुर्गा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 14:00 IST

नऊ मुलींनी हातात शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके घेऊन 'सरस्वतीचा' दुर्गा रूपातील देखावा सादर केला

श्रीकांत ऱ्हायकरधामोड : धामोड (ता. राधानगरी) येथील सह्याद्री हायस्कूलमधील विद्यार्थीनींनी नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून पाठ्यपुस्तकाच्या रूपात नवदुर्गा अवतरली. सहाय्यक शिक्षक एस .एम.ऱ्हायकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थीनींनी दुर्गामातेचे एक रूप सादर करत अनोख्या पद्धतीने संदेश दिला. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाने विद्यार्थीही भारावून गेले. आजच्या काळातील स्त्री शिक्षणाचे महत्व अधोरेखीत करण्याच्या उद्देशाने आम्ही हा देखावा सादर  करण्याचा प्रयत्न केला असल्याचे शिक्षक ऱ्हायकर यांनी सांगितले.विज्ञान प्रदर्शन असो की शैक्षणिक अध्ययन -अध्यापन किंवा सहशालेय उपक्रम सह्याद्री हायस्कूल नेहमीच आगळे-वेगळे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात नेहमी पुढे असते. परीसरातील जवळपास २५ वाडया वस्त्यावरील ५५० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत शाळेने आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे.शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शाळेत दांडीया खेळाचे आयोजन केले होते. या खेळादरम्यान दहावीच्या विद्यार्थीनींनी स्त्री शिक्षणाचे महत्व व गरज या विषयावर अनोख्या पद्धतीने संदेश दिला. नऊ मुलींनी हातात शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके घेऊन 'सरस्वतीचा' दुर्गा रूपातील देखावा सादर केला. टाळ्यांच्या कडकडाटात या देखाव्याला विद्यार्थ्यांनी दाद दिली. यावेळी शाळेचे प्राचार्य एस .एल. उगारे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीNavratriनवरात्रीStudentविद्यार्थी