शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोबोटिक प्रशिक्षण

By समीर देशपांडे | Updated: November 4, 2023 12:17 IST

जिल्हा नियोजन समितीमधून २ कोटी ७६ लाख २४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध

समीर देशपांडे

कोल्हापूर : विद्यार्थ्यांना शालेय वयातच रोबोटिक्स तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, यासाठी कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या ३३० शाळांना रोबोटिक्स किट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच फायदा १० हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २ कोटी ७६ लाख २४ हजार रुपयांचा निधी उपलब्धही झाला आहे. याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या नावीन्यपूर्ण योजनेतून हे नियोजन करण्यात आले आहे. सहावी ते आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आखण्यात आली आहे. विविध संशोधकांच्या मते, प्रारंभिक शिक्षणातील स्टीम म्हणजेच सायन्स टेक्नाॅलाॅजी इंजिनिअरिंग अँड मॅथेमॅटिक्स रोबोटिक्स प्रशिक्षण हे भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्टीम एज्युकेशनच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये अनौपचारिक शिक्षणामुळे स्टीम विषयांमध्ये रस निर्माण होऊ शकते, असे स्पष्ट केले आहे.प्राथमिक स्तरापासूनच शिक्षण पद्धतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्गातील संकल्पना व्यावहारिक अनुप्रयोगांसह जोडण्यास उत्सुक बनवण्यासाठी आणि रोबोटिक्सच्या साहाय्याने मिळालेल्या ज्ञानाकडे विद्यार्थी जाण्यास शिकतो आणि प्रक्रियेत तर्क आणि तर्काची कौशल्ये मिळवून समाधान केंद्रित दृष्टिकोनाने शिकतो, असा दावा याबाबतच्या जिल्हा परिषदेच्या टिपणीमध्ये करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांची होणार पूर्वपरीक्षाया किट्सच्या माध्यमातून १० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. परंतु, ३३० शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या १८ हजार आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची आधी पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे. त्यातून गणित, विज्ञान, तंत्रज्ञान विषयाकडे कल असणाऱ्या दहा हजार विद्यार्थ्यांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. यासाठी एकूण खर्च ३ कोटी ८६ लाख रुपये येणार असून त्यापैकी २ कोटी ७६ लाख रुपये जिल्हा परिषदेला उपलब्ध झाले आहेत. खरेदी समितीच्या १३ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील केंद्र शाळा पूर्ण सुसज्ज करण्यात येणार असून, त्यांना आदर्श शाळा बनवण्याचा संकल्प आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू असून या शाळांमध्ये प्राधान्याने रोबोटिक्स किट देण्याचा मानस आहे. -संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदStudentविद्यार्थीRobotरोबोट