शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

उत्कंठा अन् आनंदी चेहऱ्यांनी घेतली आकाशात झेप; कोल्हापूर महापालिका शाळेतील विद्यार्थी विमानाने ‘इस्त्रो’कडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 16:51 IST

कोल्हापूर : आकाशातून जाणारे विमान कुतूहलाने पाहण्याचे प्रसंग अनेकदा आले; परंतु त्यामध्ये बसून प्रवास करण्याचे भाग्य जीवनात कधी आले ...

कोल्हापूर : आकाशातून जाणारे विमान कुतूहलाने पाहण्याचे प्रसंग अनेकदा आले; परंतु त्यामध्ये बसून प्रवास करण्याचे भाग्य जीवनात कधी आले नाही. त्यामुळे मनात कमालीची उत्कंठा, काहीशी भीती घेऊनच ते विमानतळावर पोहोचले. विमान कधी येणार याची लागून राहिलेली प्रतीक्षा एकदाची संपली आणि पुढे विमानाच्या दिशेने जायला लागले तेव्हा चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहून विमानतळावरील चित्रही काहीसे बदलून गेले. उत्कंठा, उत्साह, आनंदाच्या साक्षीने त्यांनी आकाशात झेप घेतली तेव्हा सगळेच बावरून गेले.महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती शाळेतील इयत्ता ५ वी च्या १७ विद्यार्थ्यांनी शासनामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवून उत्तुंग यश संपादन केले. त्यामुळे या यशस्वी विद्यार्थ्यांची इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. त्यांचा हा दौरा चक्क विमानाने असल्याने सर्वच विद्यार्थी खुशीत होते. कोल्हापूरच्या शैक्षणिक इतिहासात हे प्रथमच घडले. या अभ्यास दौऱ्यासाठी प्रशासनाधिकारी शंकर यादव यांचे नेतृत्वाखाली दोन मार्गदर्शक शिक्षक, एक महिला डॉक्टर, १७ विद्यार्थ्यांच्यासह इसरो बंगळुरूकडे रवाना झाले. अभ्यास दौऱ्यासाठीचा येणारा खर्च महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.महापालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यात अशा प्रकारे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. आजच्या युगात भविष्यात अनेक क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपल्या कलानुसार सखोल अभ्यास करून जीवनात यशस्वी व्हावे’ असेही त्या म्हणाल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांब्यासह अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी अभ्यास दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांना सहलीस पाठवण्यासाठी पालकांनी व नातेवाइकांनी महापालिकेत, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली. केएमटीतर्फे विद्यार्थ्यांना विमानतळापर्यंत नेण्यासाठी खास बसची व्यवस्था केली होती. महापालिकेच्या मुख्य इमारतीतील चौकामधून बसमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय येथे नेण्यात आले. तेथे प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र, शुभेच्छापत्र व ट्रॉफी देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ल. कृ. जरग विद्यालय जरगनगर, नेहरूनगर वसाहत विद्यालय, टेंबलाईवाडी विद्यालय या मनपा शाळांचा समावेश आहे. याप्रसंगी शिक्षक समिती कोल्हापूर शहरमार्फत पेन व डायरी देण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरisroइस्रोairplaneविमानStudentविद्यार्थी