शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांची इस्रोकडे भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 17:35 IST

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील ५६ विद्यार्थी सोमवारी बंगळुरू येथील इस्रोला भेट देण्यासाठी कोल्हापूर विमानतळावरून बंगळुरू येथे रवाना ...

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील ५६ विद्यार्थी सोमवारी बंगळुरू येथील इस्रोला भेट देण्यासाठी कोल्हापूर विमानतळावरून बंगळुरू येथे रवाना झाले. मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ५६ विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकाविले आहे. यापैकी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या २१ विद्यार्थ्यांची बंगळुरू येथील इस्रोची भेट घडवून आणली जात आहे. हे सर्व विद्यार्थी सोमवारी रवाना झाले. या विद्यार्थ्यांना केएमटीच्या वातानुकूलित सजविलेल्या बसमधून विमानतळापर्यंत सोडण्यात आले. यावेळी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व रवाना करण्यासाठी आमदार अमल महाडिक, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त साधना पाटील, पुष्कराज क्षीरसागर, सहा. आयुक्त उज्ज्वला शिंदे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ उपस्थित होते. या विद्यार्थ्यांसोबत प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे, एक शिक्षक, एक शिक्षिका व एक महिला डॉक्टर रवाना झाले. हे विद्यार्थी एअरपोर्टवर गेल्यावर विमानतळ व्यवस्थापनाच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून केक कापण्यात आला.आज, उद्या करणार पाहणीबंगळुरू येथील इस्रोकडे आज मंगळवारी व उद्या बुधवारी भेट दिली जाणार आहे. याकरिता विद्यार्थ्यांना एक वेळ विमानाने प्रवास, परतीचा रेल्वेने प्रवास व संबंधित पर्यटन बसद्वारे केले जाणार आहे. या मोहिमेत इस्रोचे इस्ट्रक्ट तसेच मोक्स व पिन्या हा औद्योगिक परिसर पाहण्याची संधी मिळणार आहे. सर्व विद्यार्थांना व शिक्षकांना क्रिडाईतर्फे सूट व बूट उपलब्ध करून दिले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरisroइस्रोStudentविद्यार्थीairplaneविमान