शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शकता नसेल तर ‘नेट’ परीक्षा घेताच कशाला?, विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 16:05 IST

परीक्षा रद्द केल्याने प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय

कोल्हापूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने (एनटीए) घेण्यात आलेली यूजीसी नेट परीक्षा बुधवारी रद्द करण्यात आली. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा अहवाल मिळाल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने हा निर्णय घेतला. एकतर ‘नीट’चा घोळ अद्याप सुरूच असताना आता ‘ने”मध्येही गैरप्रकार आढळून आल्याने विद्यार्थी कमालीचे नाराज झाले. परीक्षांमध्ये पारदर्शकता ठेवता येत नसेल तर अशा परीक्षा घेताच कशाला? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने (एनटीए) मंगळवारी (दि. १८) यूजीसी नेट परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात १ हजार ८३७ विद्यार्थ्यांनी नेट परीक्षा दिली होती. विशेष म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना शंभर शंभर कि.मी. दूर परीक्षा केंद्र मिळाल्याने या विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही. परिणामी, जिल्ह्यात ८५५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा अहवाल सायबर सिक्युरिटीकडून देण्यात आल्याने खळबळ उडाली.‘यूजीसी’ने याची दखल घेत परीक्षाच रद्द केली. मात्र, प्रामाणिक विद्यार्थ्यांवर हा अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. नेटसाठी वर्ष-वर्ष तयारी करून अनेक विद्यार्थी परीक्षा देत असतात. मात्र, यात पारदर्शकता नसेल तर आम्ही परीक्षा द्यायच्याच कशासाठी? असा सवाल विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे. महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक हाेण्यासाठी ‘नेट’ अनिवार्य आहे. शिवाय, पीएच.डी.साठी प्रवेश मिळवण्यासाठी ‘नेट’ची गरज भासते.

विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकाच चुकीच्याया परीक्षेत हिंदी विषयाच्या विद्यार्थ्याला उर्दूची प्रश्नपत्रिका, तर इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेऐवजी इंग्रजीची प्रश्नपत्रिका मिळाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर हा प्रकार घडल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी थेट ‘यूजीसी’कडे मेलद्वारे तक्रार केली आहे.

नेट परीक्षेचे व्यवस्थापन नीट करता येत नसेल तर परीक्षा घेता कशाला? परीक्षेचे सेंटर ८०-८० किलोमीटर दूर असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे टाळले. दोन सत्रांत परीक्षा, त्यात केंद्र दूर यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले. - डॉ. प्रवीण कोडोलीकर, परीक्षार्थी, कोल्हापूर. 

खूप मेहनत करून अनेक विद्यार्थी ‘नेट’ची परीक्षा देत असतात. मात्र, गैरप्रकारामुळे या परीक्षेबद्दलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी परीक्षा पूर्णत: पारदर्शकपणे घ्यावी. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी. - प्रा. डॉ. आर. एल. निर्मळे-चौगुले, प्राचार्य, अशोकराव माने बी.एड.कॉलेज, पेठवडगाव.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षाStudentविद्यार्थी