शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रीलसाठी साडी आणण्याकरिता आली... ट्रकच्या धडकेत जीव गमावली; कोल्हापुरातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 16:48 IST

मयत मूळची उंब्रजची, ट्रकचालक पसार

कोल्हापूर : वर्गमित्राच्या दुचाकीवरून इन्स्टाग्रामवरील रिलसाठी साडी घेऊन जाताना सोन्या मारूती चौकातील भगतसिंग तरुण मंडळाजवळ सिमेंट मिक्सर रेडीमिक्स काॅंक्रीट ट्रकने धडक दिल्याने इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.

श्रेया महेश देवळे (वय १९, मूळ गाव : उंब्रज, ता. कराड, जि. सातारा, सध्या रा : साळोखेनगर कळंबा रिंगरोड, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी मिक्सरच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिस फिर्यादीत म्हटले आहे, मयत श्रेया साळोखेनगरात मैत्रिणीसह शिक्षणानिमित्त राहते. बुधवारी दुपारी वर्गमित्र ओम संदीप पाटील (वय १९, रा. प्रथमेशनगर कळंबा रिंगरोड, कोल्हापूर) याला रिल बनवण्यासाठी साडी हवी आहे, असे तिने सांगितले. ओम रात्री साडेनऊच्या सुमारास श्रेयाला दुचाकीवर मागे बसवून गंगावेश येथे आला.

मामाच्या घरातील साडी घेऊन पुन्हा गंगावेश पंचगंगा नदीमार्गे सोन्या मारूती चौकात आला. रात्री साडेदहाच्या सुमारास सिमेंट मिक्सर ट्रकचालक दुचाकीला ओव्हरटेक करून पुढे अचानक डावीकडे वळला. त्यावेळी ट्रकचे पाठीमागील डाव्या बाजूचे चाक ओमच्या दुचाकीला धडकले. दुचाकी जमिनीवर पडल्याने ओम आणि मागे बसलेली श्रेयाही रस्त्यावर पडली. परिसरातील लोकांनी दोघांनाही उचलले. दुचाकीवर मागे बसलेल्या श्रेयाच्या डोक्याला आणि डाव्या हाताला जखम झाली होती. तातडीने श्रेयाला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. ओम पाटील हाही जखमी आहे. त्याच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.ट्रकचालक पसारअपघात झाल्यानंतर लोकांची गर्दी झाली. जखमी श्रेयाला उचलण्यासाठी अनेकजण धावून आले. त्याचवेळी ट्रकचालक पळून गेला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.