शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

खुन्यांचा तपास लागेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत ॲड. गोविंद पानसरे यांच्या खुन्यांचा तपास लागत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत ॲड. गोविंद पानसरे यांच्या खुन्यांचा तपास लागत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार शनिवारी सकाळी झालेल्या निर्भय माॅर्निंग वाॅकमध्ये करण्यात आला. या माॅर्निंग वाॅकचे शहीद काॅम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

सहाव्या स्मृतिदिनानिमित्त पानसरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर तोरणानगरातील त्यांच्या घरापासून त्यांच्यावर गोळीबार झालेल्या ठिकाणापर्यंत वाॅक करण्यात आला. ‘काॅम्रेड पानसरे को लाल सलाम’, ‘गोविंद पानसरे अमर रहे’, ‘काॅम्रेड पानसरे का अधुरा काम कौन करेगा, हम करेंगे हम करेंगे’, ‘आम्ही सारे पानसरे’, अशा घोषणा देत हा माॅर्निंग वाॅक झाला. यावेळी सर्वांनी जोपर्यंत पानसरे, डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांचा तपास करून त्यांना शासन होत नाही. तोपर्यंत शासनाला आठवण करून देण्यासाठी या वाॅकचे आयोजन केले जाणार आहे. जोपर्यंत खुन्यांचा तपास लागत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवू या, असा निर्धार उपस्थितांनी केला. यावेळी पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे, स्नुषा मेघा पानसरे, सुरेश शिपूरकर, प्राचार्य टी.एस. पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकाप्पा भोसले, आनंदराव परुळेकर, दिलीप पवार, प्रा. उदय नारकर, नामदेव गावडे, गिरीश फोंडे, सतीशचंद्र कांबळे, दिलदार मुजावर, बी.एल. बर्गे, आशा बर्गे, बळवंत पोवार, भगवान यादव आदी मान्यवर उपस्थित होते.