लढाऊ बाण्याचा कणखर नेता : विजयसिंह मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:00 IST2021-01-13T05:00:45+5:302021-01-13T05:00:45+5:30

विजयसिंह कृष्णाजी मोरे यांचा जन्म ११ जानेवारी १९६२ रोजी राधानगरी तालुक्यातील सरवडे या गावी झाला. गेली अनेक शतके ...

Strong leader of fighting spirit: Vijay Singh More | लढाऊ बाण्याचा कणखर नेता : विजयसिंह मोरे

लढाऊ बाण्याचा कणखर नेता : विजयसिंह मोरे

विजयसिंह कृष्णाजी मोरे यांचा जन्म ११ जानेवारी १९६२ रोजी राधानगरी तालुक्यातील सरवडे या गावी झाला. गेली अनेक शतके विजयसिंह मोरे यांनी जी कीर्ती आणि मोठेपण मिळवले ते स्‍वकर्तृत्‍वातून. राजकीय जीवनातील चढ-उतार जनतेच्या प्रेमातून आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर त्यांनी नि:स्वार्थी सेवेतून शिक्षण, सहकार व सामाजिक उपक्रमात सातत्याने सहभागी राहून जनतेच्या सोयी आणि सेवेसाठी कायमपणे लोकांची सेवा ते करत आले आहेत. तालुक्यातील धडाडीचे नेतृत्व म्हणजे विजयसिंह मोरे होत. सत्ता असो, अगर नसो, राजकारणापेक्षा समाजकारणासाठी अधिकाधिक वेळ देऊन मोरे घराण्याने अनेक वर्षे कार्यकर्ते आणि माणसांची आपुलकी जोपासली आहे. समाजमनावर वेगळा ठसा त्यांनी उमटवला आहे. तंटे न्यायालयात किंवा पोलीस ठाण्यात मिटवले नाहीत. ते तंटे मोरे घराण्याने सोडविण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. मोरे यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व कुटुंब लोकांच्या सेवेसाठी कार्यरत राहिल्याने तालुक्यात मोरे यांची वेगळी छाप आहे. त्यांनी तालुक्यात कार्यकर्त्यांची एक विश्वासू फळी निर्माण करताना सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. विविध पदांवर काम करताना केवळ गरजू व गरिबांचा विकास हा ध्यास ठेवून राजकारण केले आहे. ते कोणतीही निवडणूक असो वा कार्यक्रम असो, तो प्रचंड शक्तीने पार पाडण्याची खासियत मोरे गटाने आजतागायत कायम ठेवली आहे.

अनेक प्रकारच्या राजकीय संघर्षात त्यांनी निर्धार केला. राधानगरी तालुक्याच्या विकासाचा शिक्षणाची गंगोत्री सामाजिक तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा, कष्टकरी माणसांचे अश्रू पुसण्याचा सामान्य माणसांच्या जीवनात सुखाचे घास भरवण्याचा आणि शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांचे विचार आचरणातून लोकांमध्ये रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यांनी नेहमीच चंगळवादी, भोगवादी प्रवृतीला प्रखर विरोध केला आहे. मोरे यांच्या राजकीय निर्धाराचा श्रीगणेशा बिद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून झाला. संचालक ते उपाध्यक्षपदापर्यंत अनेक वर्षे काम केले. मितभाषी, भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि मनमिळाऊ स्वभावामुळे जनसामान्यांत त्यांची प्रतिमा आपलेपणाची बनली. जनसागराच्या अथांग प्रेमाची आठवण ठेवून राधानगरी तालुक्यातील गावागावांत सहकाराची बीजे त्यांनी रोवली. माजी आमदार किसनराव मोरे यांच्या वारसा पाठीशी घेऊन नवा दृष्टिकोन, नव्या संकल्पना राबवत यांनी विविध कामांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. ‘ज्ञानही परम बलम्’ हे ब्रीदवाक्य घेऊन किसनराव मोरे एज्युकेशन सोसायटी नावाने लहानसे रोपटे त्यांनी लावले. आज या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. माजी पंचायत समिती सदस्य आर.के. मोरे, डी ........................................................ व जे ..................................... या बंधूंच्या सहकार्यातून गावागावांत शेतकरी मेळावे घेतले आहेत. मोरे अनेक संकटांना सामोरे जात उमेदीने, त्याच विश्वासाने प्रगतीच्या क्षितिजाकडे अखंडपणे वाटचाल करत आहेत. त्यांच्या भावजय कल्पना राजेंद्र मोरे या पंचायत समिती सदस्या आहेत, तर सून मनोज्ञा दिग्विजय मोरे या सरवडेच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.

-दत्ता लोकरे सरवडे

Web Title: Strong leader of fighting spirit: Vijay Singh More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.