शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kdcc Bank Election : सभा आरोप-प्रत्यारोपांसाठी... मात्र व्यक्तिगत प्रचारावरच भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 12:26 IST

जाहीर सभांमधून एकमेकांवर जोरदार प्रहार केला जात असतानाच राजकारणातील ‘आदानी-अंबानी’पर्यंत टीकेची पातळी पोहोचली आहे.

कोल्हापूर : जिल्हा बँकेसाठी सत्तारूढ व विरोध आघाडीमध्ये जाहीर सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या तरी प्रचार मात्र व्यक्तिगतच सुरू आहे. सगळ्याच उमेदवारांनी प्रचारपत्रिका स्वतंत्र काढून व्यक्तिगत प्रचारावर भर दिला आहे. त्यामुळे सभा फक्त आघाडी एकसंध आहे, एवढेच सांगण्यासाठी ठरत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

जिल्हा बँकेच्या सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी सत्तारूढ व विरोधी परिवर्तन आघाडी रिंगणात उतरली आहे. गेली सहा वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र नांदणारे नेते अनपेक्षितपणे एकमेकांच्या विरोधात भिडले आहेत. जाहीर सभांमधून एकमेकांवर जोरदार प्रहार केला जात असतानाच राजकारणातील ‘आदानी-अंबानी’पर्यंत टीकेची पातळी पोहोचली आहे.सभांमधून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या तरी प्रचार मात्र व्यक्तिगतच दिसत आहे. जुनी मैत्री, नात्यागोत्याचे संबंध व सोयीच्या राजकारणामुळे प्रत्येक उमेदवाराने सावध भूमिका घेतली आहे. व्यक्तिगत गाठीभेटींसह प्रचाराचे सर्व फंडे वापरले जात आहेत.

पतसंस्था, बँकांमध्ये धक्कादायक निकाल?

बँकेच्या २१ जागांपैकी पतसंस्था व बँका या गटात आमदार प्रकाश आवाडे, विद्यमान संचालक अनिल पाटील व अर्जुन आबीटकर यांच्यात काट्याची टक्कर पहावयास मिळत आहे. या गटात देवघेवीबरोबरच माेठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप सुरू झाल्याने धक्कादायक निकाल अपेक्षित आहे.

‘गोकुळ’, विधान परिषद राजकारणाची झळ बसणार

‘गोकुळ’च्या निवडणुकीत एकमेकांविरोधात शड्डू ठोकणारी मंडळी एकत्र आली आहेत. तेच मतदार सहा उमेदवारांना मतदान करणार आहेत. ‘गोकुळ’मध्ये झालेल्या दगाफटक्याचा हिशोब सुररू झाला असून, विधान परिषद निवडणूक जरी बिनविरोध झाली असली तरी त्या राजकारणाला अनेक कंगोरे आहेत. या दोन्ही निवडणुकांची झळ काहींना बसणार हे मात्र निश्चित आहे.

करेक्ट कार्यक्रमाची अनेकांना धास्ती

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला. त्याची धास्ती येथील उमेदवारांनी घेतली आहे. येथेही शेवटच्या दोन दिवसात तशा हालचाली होण्याची शक्यता आहे. ते गृहीत धरूनच प्रत्येकाने आपापली यंत्रणा सक्रिय केल्याचे चित्र आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकElectionनिवडणूकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा