शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

कडकडीत बंद अन तुरळक वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कडक लॉकडाऊनमधील शेवटचा रविवार. शहरातील सर्व भागात कडकडीत बंद, शांतात, सन्नाटा, प्रमुख रस्त्यावर तुरळक गर्दी, पोलीस बंदोबस्त ...

कोल्हापूर : कडक लॉकडाऊनमधील शेवटचा रविवार. शहरातील सर्व भागात कडकडीत बंद, शांतात, सन्नाटा, प्रमुख रस्त्यावर तुरळक गर्दी, पोलीस बंदोबस्त असे दिवसभरातील चित्र राहिले. सोमवारपासून सकाळच्या टप्यात दुकाने सुरू होणार असल्याने स्वत:हून नागरिक घराबाहेर पडणे टाळल्याचे दिसले.

रविवारी सुटीचा दिवस असल्याने इतरवेळी कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी असते; पण कडक लॉकडाऊनचा रविवार असल्याने शहरातील अनेक रस्ते ओस पडले होते. प्रमुख रस्त्यावर अत्यावश्यक सेवेसाठीची आणि आरोग्य कारणासाठी बाहेर पडलेल्यांचीच वाहने राहिली. ताराबाई रोड, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, गांधीनगर येथील मार्केटमध्ये शुकशुकाट राहिला. रंकाळा आणि मध्यवर्ती बसस्थानकात पार्किंग केलेले बसच दिसत होते. अधिकारी, कर्मचाऱ्यांची वर्दळही नव्हती. हा परिसर निर्मनुष्य दिसत होता; पण महापालिकेतर्फे शहरात सुरू केलेल्या कोविड काळजी केंद्रासमोर आणि कोरोना रुग्णावर उपचार करण्यात येणाऱ्या शहरातील सर्व हॉस्पिटल, औषध दुकानांत नातेवाइकांची वर्दळ अधिक दिसत होती. तेथील अनेक नातेवाइकांच्या चेहऱ्यावर चिंता गडद दिसत होती.

ताराराणी चौक ते टेंबलाई नाका आणि राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची संख्या कमी होती. सीपीआर, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी आदी हॉस्पिटल असलेल्या ठिकाणी दिवसभर रुग्णवाहिका धावत राहिल्या. त्यांच्या सायरनच्या आवाजाने चिंतेत भरच पडत होती. शिवाजीपेठ, मंगळवारपेठ, कसबा बावडा अशा निवासी ठिकाणी काही तरुण कट्ट्यावर बसून दिवसभर चर्चेचा फड रंगवला.

चौकट

शेवटचाच लॉकडाऊन ठरावा

शहरावर यापुढे कधीही कडक लॉकडाऊनची वेळ येऊ नये, आठ दिवसांचा लॉकडाऊन शेवटचाच ठरावा, अशा प्रतिक्रिया रविवारी दिवसभर शहरातील सामान्यांमध्येही होत्या. लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर सेवेत असणारे पोलीस काही प्रमाणात निवांत दिसत होते. बहुतांशी दुकानदार, व्यापारी आज, सोमवारपासून दुकाने सुरू करण्याची तयारी करीत होते.

चौकट

महाद्वार रोड सुनासुना

महाद्वार रोड, अंबाबाई मंदिर परिसरात प्रत्येक रविवारी मोठी गर्दी असते. पर्यटकांनी हा परिसर फुलून गेलेला असतो; पण दिवसभर या परिसरात नीरव शांतता राहिली. केवळ बंदोबस्तातील पोलिसांची तुरळक गर्दी दिसली. बिंदू चौकातील पार्किंगचे ठिकाण पूर्णपणे रिकामे होते.

फोटो ओळी

कडक लॉकडाऊनमुळे रविवार असूनही ताराराणी रोड ते टेंबलाई नाका येथील प्रमुख रस्ता असा सुनासुना होता. फोटो : नसीर अत्तार

फोटो : २३०५२०२१ कोल ताराराणी चौक

कडक लॉकडाऊनमुळे रंकाळा बसस्थानक परिसरात असा सन्नाटा होता.

फोटो : नसीर अत्तार

फोटो : २३०५२०२१ कोल रंकाळा फोटो : नसीर अत्तार