परदेशी सिगारेटची विक्री केल्यास कडक कारवाई : मोहन केंबळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 18:57 IST2020-03-07T18:54:26+5:302020-03-07T18:57:04+5:30
देशात परदेशातून येणाऱ्या सिगारेटच्या विक्रीस बंदी आहे. तरीही पानपट्टीधारकांकडून त्याची विक्री होत असून, ते निदर्शनास आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी शनिवारी येथे दिला.

कोल्हापुरातील बेलबाग येथील एका हॉलमध्ये शनिवारी आयोजित कोल्हापूर जिल्हा पानपट्टीधारक असोसिएशनच्या मेळाव्यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी मार्गदर्शन केले. (छाया : अमर कांबळे)
कोल्हापूर : देशात परदेशातून येणाऱ्या सिगारेटच्या विक्रीस बंदी आहे. तरीही पानपट्टीधारकांकडून त्याची विक्री होत असून, ते निदर्शनास आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी शनिवारी येथे दिला.
मंगळवार पेठ, बेलबाग येथील एका हॉलमध्ये कोल्हापूर जिल्हा पानपट्टीधारक असोसिएशनतर्फे आयोजित प्रबोधनात्मक मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरुण सावंत होते. उपाध्यक्ष उमेश ठोंबरे, उद्योजक गिरीष शहा, उमेश शेटे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राजेश बाभूळकर, लक्ष्मण जिरंगे, राजेश केसरकर, तय्यब मोमीन, सुधीर जितकर, सूरज जाधव, आदींसह जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांतील पानपट्टीचालक उपस्थित होते.