शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे धुण्यासाठी बंद केल्यामुळे पंचगंगा घाटावर तणाव,जनावर मालक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 19:52 IST

Pollution kolhapurnews- प्रदूषण टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने पंचगंगा घाटासह शहरातील तलावात जनावरे धुण्यासाठी बंदी घातली आहे. असे कृत्य केल्यास थेट फौजदारी दाखल करण्याचे आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देजनावरे धुण्यासाठी बंद केल्यामुळे पंचगंगा घाटावर तणाव,जनावर मालक आक्रमक बंदोबस्तास असणाऱ्या पोलीस, महापालिका अधिकाऱ्यांना विचारला जाब

कोल्हापूर : प्रदूषण टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने पंचगंगा घाटासह शहरातील तलावात जनावरे धुण्यासाठी बंदी घातली आहे. असे कृत्य केल्यास थेट फौजदारी दाखल करण्याचे आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर महापालिका, पोलीस प्रशासनाचा शनिवारी सकाळपासून पंचगंगा घाट येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. यामुळे सायंकाळी पाच वाजता जनावरे धुण्यासाठी आलेले नागरिक आक्रमक झाले. अचानक बंदी घातल्यावरून त्यांनी पोलीस, महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी काहीकाळ तणावपूर्ण वातावरण होते.महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शनिवारी सकाळपासूनच पंचगंगा घाटावर नदीकडे जाणारा मार्ग बॅरिकेटस लावून बंद केला आहे. यामुळे जनावरे घेऊन आलेले गोपी केसरकर, अक्षय राबाडे, सुरेश रोटे, सिद्धापा गवळी, अवधूत सावंत, नवनाथ गवळी, बिंदू राबाडे, दिलीप राबाडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला.

पर्याय देत नाही तोपर्यंत पाणी पिण्यासाठी तरी आत सोडण्यास परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली. अधिकाऱ्यांनी प्रशासनाचे आदेश असल्याने सोडता येत नसल्याचे म्हटले.कोल्हापूर महापालिकेने पंचगंगा नदीत जनावरे धुण्यासाठी बंदी घातली आहे. येथे शनिवारी सकाळपासूनच चोख बंदोबस्त ठेवला असून, बॅरिकेट‌्स लावून नदीकडील मार्ग बंद केला. यामुळे जनावरांसह त्यांचे मालक येथे थांबू्न होते. 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषण