शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

ऊसशेती तांबेऱ्याच्या विळख्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:17 IST

श्रीकांत ºहायकर।लोकमत न्यूज नेटवर्कधामोड : संपूर्ण राधानगरी तालुक्यासह, करवीर तालुक्यात ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतीमधील उभे ऊसपीक बºयाच ठिकाणी धोकादायक स्थितीत दिसत आहे. ऊसपिकावर पडलेला तांबेरा कसा आटोक्यात आणयचा या प्रश्नाने शेतकºयांना ग्रासले आहे. ऊस शेती तांबेरा रोगाच्या विळख्यात सापडली असल्याचे यावर्षी ऊस उत्पादनात ...

श्रीकांत ºहायकर।लोकमत न्यूज नेटवर्कधामोड : संपूर्ण राधानगरी तालुक्यासह, करवीर तालुक्यात ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतीमधील उभे ऊसपीक बºयाच ठिकाणी धोकादायक स्थितीत दिसत आहे. ऊसपिकावर पडलेला तांबेरा कसा आटोक्यात आणयचा या प्रश्नाने शेतकºयांना ग्रासले आहे. ऊस शेती तांबेरा रोगाच्या विळख्यात सापडली असल्याचे यावर्षी ऊस उत्पादनात २० टक्के घट येईल, असा शेतीतज्ज्ञांचा अंदाज आहे. परिणामी पुन्हा एकदा शेतकरीच निसर्गाच्या अस्मानी संकटात सापडला आहे .ऊसपीक हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख शेतीपीक म्हणून ओळखले जाते. कारण जिल्ह्याच्या कानाकोपºयांत ऊसपिकाची लागवड झालेली दिसते. त्यामुळे बहुतांशी शेतकºयाचे जीवनमान हे ऊसशेतीवर अवलंबून आहे; पण असे असले तरी कमी खर्चाची, कमी कष्टाची शेती म्हणजे ऊसशेती ही ओळख आता ऊस शेतकºयांसाठी कालबाह्य ठरली आहे. नवनवीन प्रयोग राबवून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे पण वेळोवेळी शेतीवर कोसणाºया अस्मानी संकटाने शेतकरी खचला जात आहे. यावर्षी तर ऊस शेतीवर एक भले मोठे संकटच कोसळले आहे. संपूर्ण ऊसशेती तांबेरा रोगाच्या विळख्यात सापडली आहे. उत्पादन घटीबरोबरच जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. उसाचा हिरवा पाला हा शेतकºयांच्या पाळीव दुभत्या प्राण्यांना वैरण म्हणून उपयोगी होतो पण हा पाला कुजल्याने शेतकरी अडचणीत आहे.उसावर तांबेरा हा कवकजन्य रोग हा बुरशीमुळे होत असतो. उसाच्या पानावर सुरवातीला तांबडे टिपके पडतात नंतर सदर टिपक्यांचा आकार वाढत जातो उसाच्या पानांचा भुगा झालेला आढळतो. ऊसपिकाची पाने तांबडी पडून पानाच्या खालील बाजूस तांबूस पिटळी पडते. परिणामी पानेच खराब झाल्याने ऊसरोपांतील प्रकाश संश्लेषण प्रक्रिया खंडित होण्याच्या मार्गावर असते. त्याचा फटका ऊस धाटाची वाढ खुंटते आणि उत्पादन घटते. अगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकºयांना तांबेरा रोगाच्या सुलतानी संकटाने ग्रासले आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण ऊसशेतीचा प्लॉट खराब झालेले पाहण्यास मिळत आहेत. तांबेरा रोगावर सद्य:स्थितीत कोणत्या उपाययोजना कराव्यात या विवंचनेत शेतकरी असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.सततचा रासायनिक खतांचा वापर, नवीन संकरित ऊस जाती, उसाच्या सरीतील अंतर कमी, युरिया खतांचा अधिक वापर यामुळे ऊस पिकावर तांबेरा रोग पडला आहे. सद्य:स्थितीत तांबेरा कमी होण्यासाठी पावसाची उघडीप व औषध फवारणी आहे; पण असे असले तरी उसावर मोठ्या प्रमाणात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने औषध फवारणी कशी व कोठे-कोठे करायची हे मोठे आव्हान शेतकºयांच्या समोर आहे पण तरीही औषध फवारणी करावयाची झाल्यास डायथेन, क्लीक्झिन अशा फवारण्या केल्या नंतर तांबेरा काही प्रमाणात नियंत्रणात आणता येतो, असे शेतीतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.