शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: किणी टोलनाक्यावरील टोल वसुली बंद करा, 'मनवा'सेनेच्यावतीने महामार्ग रोको आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 17:12 IST

टोल वसुली बंद झालीच पाहिजे, सहापदरीकरण झाले नाही तर टोल कशासाठी?

संतोष भोसले  किणी : पुणे-बंगळूरु महामार्गावरील किणी (ता. हातकंणगले) येथील टोलनाक्याची मुदत संपून सुध्दा टोल वसुली सुरूच ठेवल्याने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्यावतीने किणी टोल नाक्यावर महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी टोलप्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर, टोल वसुली बंद करावी या मागणीचे निवेदन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांना दिले.पुणे-बंगळूरु महामार्गावरील किणी व तासवडे (जिल्हा सातारा) टोल नाक्याची मुदत संपली आहे. मात्र, सहापदरीकरणाचे कारण देत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्यावतीने टोल वसुली सुरूच ठेवण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.आज, मंगळवार सकाळी बारा वाजता वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजु जाधव याच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी टोलनाक्यावर टोल वसुली बंद झालीच पाहिजे, सहापदरीकरण झाले नाही तर टोल कशासाठी अशा घोषणाबाजी करत काळे कपडे परिधान करून डोळ्यावर काळी पट्टी, हातात तराजु घेऊन जवळपास दहा मिनिटे रस्ता रोको करण्यात आला. यानंतर आदी मागणीचे निवेदन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे आधिकारी महेश पाटोळे यांना देण्यात आले.यावेळी प्रवीण माने, नागेश चौगुले, फिरोज मुल्ला, वैभव हिरवे, नयन गायकवाड, अशोक पाटील, सरदार खाटीक, गणेश बुचडे, यांच्यासह वाहतूक सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनस्थळी पेठवडगाव पोलिस ठाण्याच्यावतीने जलद कृती दलाच्या तुकडीसह पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtollplazaटोलनाकाMNSमनसे