शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कसबा बावड्यात पाण्यासाठी रास्ता रोको, दोन्ही बाजूला महिलांनी दीड तास वाहतूक रोखली;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 00:48 IST

पुऱ्या व अनियमित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ बुधवारी मुख्य रस्त्यावर धनगर गल्लीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

कसबा बावडा : अपुऱ्या व अनियमित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ बुधवारी मुख्य रस्त्यावर धनगर गल्लीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये धनगर गल्ली, अतिग्रे गल्ली, ठोंबरे गल्लीमधील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तब्बल दीड तास झालेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. धनगर गल्लीत पाण्याचा व्हॉल्व्ह बसवून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल हे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

धनगर गल्ली, अतिग्रे गल्ली, ठोंबरे गल्ली यासह परिसरातील गल्ल्यांमध्ये नेहमीच अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे या भागातील महिला संतप्त झाल्या होत्या. पाणी येण्याची निश्चित वेळ नाही. रात्री-अपरात्री कधीही पाणी येते. पाण्यासाठी अख्खी रात्र जागून काढावी लागते. यामुळे प्रशासनाचे डोळे उघडावे म्हणून सकाळी ११ वाजता मुख्य रस्त्यावरच महिलांनी ठिय्या मांडला. यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण आयुक्त आल्याशिवाय आता मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका महिलांनी घेतली.

तब्बल तासाभरानंतर जलअभियंता सुरेश कुलकर्णी व उप जलअभियंता राजेंद्र हुजरे यांनी आंदोलक महिलांशी चर्चा करून पाणीपुरवठा लवकरच सुरळीत केला जाईल, असे सांगितले. यावेळी नगरसेविका माधुरी लाड व अभिजित जाधव यांनीही प्रशासनाला धारेवर धरले. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात आनुबाई करपे, कल्पना वावरे, छाया ठोंबरे, शांताबाई हराळे, संगीता धामणे, मंगल हराळे, सुजाता जाधव, शुभांगी पिंगळे, नीता ठोंबरे, सुवर्णा भाडळकर, कल्पना ठोंबरे, वैशाली ठोंबरे, अर्चना भाडळकर, अंजना चौगले, राजाक्का मगदूम, सुलोचना भाडळकर, ललिता माधव, कोमल सोनटक्के सहभागी झाल्या होत्या.संतापाची लाटधनगर गल्ली, अतिग्रे गल्ली, ठोंबरे गल्ली यासह परिसरातील गल्ल्यांमध्ये नेहमीच अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे या भागातील महिला संतप्त.  रात्री-अपरात्री कधीही पाणी येते. पाण्यासाठी अख्खी रात्र जागून काढावी लागते. यामुळे प्रशासनाचे डोळे उघडावे म्हणून मुख्य रस्त्यावरच महिलांचे ठिय्या आंदोलन

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater shortageपाणीटंचाई