कर्जदार, जामिनदारांवरील अन्याय थांबवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:26+5:302021-03-24T04:23:26+5:30
इचलकरंजी : खासगी वित्त संस्था, फायनान्स कंपन्या, पतसंस्था, सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांनी सर्वसामान्य कर्जदार व जामिनदार यांच्यावर होणारा अन्याय ...

कर्जदार, जामिनदारांवरील अन्याय थांबवावा
इचलकरंजी : खासगी वित्त संस्था, फायनान्स कंपन्या, पतसंस्था, सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांनी सर्वसामान्य कर्जदार व जामिनदार यांच्यावर होणारा अन्याय थांबवावा, अशी मागणी कर्जदार व जामिनदार हक्क बचाव संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष सुधीर उत्तुरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले, सर्वसामान्य कर्जदार व जामिनदार यांची आर्थिक पिळवणूक थांबावी व पुनरुज्जीवन करावे. त्यांच्यावर एकतर्फी व अन्यायी जप्तीसारख्या कारवाया होत असल्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत. त्यांच्याविरोधातील कारवाई थांबवावी; अन्यथा कृती समितीच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल. सरकारने जाहीर केलेल्या कोरोना आर्थिक योजनेचा वित्त संस्थांनीच फायदा घेतला. या योजनांचा कोणताही थेट कर्जदारांना फायदा झाला नाही. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, सतीश लाटणे, योगेश वाघमारे, संजय जकाते, नंदकुमार लोखंडे उपस्थित होते.