शहरं
Join us  
Trending Stories
1
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
2
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
3
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
4
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
5
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
6
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
7
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
8
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
9
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
10
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
11
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
12
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
13
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
14
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
16
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
17
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
18
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
19
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
20
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय

कोल्हापूर: अथर्व-दौलत कारखान्यांवर दगडफेक, कामगारांनीच कामगारांना केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 7:33 PM

बोनसच्या मागणीचा निर्णय न होताच कामावर हजर झालेल्या कामगारांना जाब विचारत केली मारहाण

निंगाप्पा बोकडे

चंदगड : हलकर्णी येथील अथर्व-दौलतच्या कामगारांनी बोनसच्या मागणीचा निर्णय न होताच कामावर हजर झालेल्या कामगारांना जाब विचारत मारहाण करत कारखान्यांवर दगडफेक केली. याप्रकारानंतर कारखाना कार्यस्थळावर तणावपुर्ण वातावरण बनले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळले. पण दिवसभराच्या चर्चेच्या गुहाळानंतर तोडगा निघाला नाही.गेल्या काही दिवसांपूर्वीच अथर्व-दौलतच्या कामगारांनी पुकारलेला संप जिल्हाधिकाऱ्यांच्या मधस्थीनंतर मिटला होता. त्यानंतर कामगारांनी अथक परिश्रम घेऊन कारखान्याचे कामही मार्गी लावले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी कामगार संघटनेने दोन पगार बोनस मिळावे म्हणून मागणी केली होती. तसेच हा निर्णय झाल्याशिवाय शिफ्टमध्ये कामाला येण्याची सक्ती करु नका, अशी मागणी कामगारांनी कारखाना प्रशासनाकडे केली होती.   पण रविवारी रात्री कारखाना प्रशासनाने कामगारांना शिफ्टची नोटीस पाठवली. त्यानुसार काही कामगार कामगार कामावरही हजर झाले होते. पण उरलेले कामगार जनरल शिफ्टमध्ये कामावर हजर होण्यासाठी गेले असता गेट बंद करून त्यांना आत घेतले नाही. या रागातून कामगारांनी हजर असलेल्या कामगारांना जाब विचारत माराहाण केली. त्यानंतर दगडफेक करून कारखान्याचे गेट टकलून आत प्रवेश केला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले. त्यानंतर तहसीलदार विनोद रणवरे, पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, गणेश फाटक, पांडूरंग बेनके, विष्णू गावडे यांनी मधस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. त्यानंतर प्रा. सुभाष जाधव, आबासाहेब चौगुले, प्रदीप पवार यांच्यासह काहीजणांनी चेअरमन मानसिंग खोराटे यांच्याशी चर्चा केली पण त्यातही काही निष्पन्न झाले नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगडSugar factoryसाखर कारखाने