गणेश विसर्जन मिरवणूक पाहणे महागात पडले; दोघांच्या गळ्यातील तीन लाखांच्या चेन लंपास

By उद्धव गोडसे | Updated: October 2, 2023 20:56 IST2023-10-02T20:54:06+5:302023-10-02T20:56:00+5:30

महाद्वार रोडवरील प्रकार.

stolen three lakh chains around the neck of both of them during ganesh visarjan in kolhapur | गणेश विसर्जन मिरवणूक पाहणे महागात पडले; दोघांच्या गळ्यातील तीन लाखांच्या चेन लंपास

गणेश विसर्जन मिरवणूक पाहणे महागात पडले; दोघांच्या गळ्यातील तीन लाखांच्या चेन लंपास

उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या दोघांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्यांनी लंपास केली. हा प्रकार गुरुवारी (दि. २८) रात्री साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास महाद्वार रोडवर घडला. याबाबत प्रवीण महादेव नरेवाडीकर (वय ५१, रा. फुलेवाडी, कोल्हापूर) यांनी सोमवारी (दि. २) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी प्रवीण नरेवाडीकर हे गुरुवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते. महाद्वार रोडवरून जाताना गर्दीत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे साडेतीन तोळ्यांची चेन लांबवली. काही वेळानंतर त्यांना चेन चोरी झाल्याचे लक्षात आले. त्याचवेळी त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका व्यक्तीच्या गळ्यातील सुमारे दीड तोळ्यांची चेन चोरीस गेल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोन लाख ९० हजार रुपयांच्या दोन चेनची चोरी झाल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे. विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी अनेकांचे मोबाइल, पाकिटे आणि दागिने लंपास केल्यामुळे मिरवणूक पाहायला जाणे त्यांना महागात पडले.

Web Title: stolen three lakh chains around the neck of both of them during ganesh visarjan in kolhapur