शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

..अन् भाड्याने क्रेन लावून चोरली कार, मित्राच्या मदतीसाठी केला पराक्रम; कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 12:24 IST

बंद अवस्थेत असलेली कार पाहून चोरीचे नियोजन केले

कोल्हापूर : मित्राची कार दुरुस्त करण्यासाठी इंजिनचा महागडा पार्ट आवश्यक होता. तो पार्ट मिळवण्यासाठी नामदेव सर्जेराव महाडिक (वय ३०, रा. महाडिकवाडी, पोस्ट कसबा ठाणे, ता. पन्हाळा) याने भाड्याने क्रेन मागवून कदमवाडीतून कार लंपास केली. शाहूपुरी पोलिसांनी २४ तासात गुन्ह्याची उकल करीत महाडिक याला अटक करून चोरीस गेलेली कार आणि चोरीसाठी वापरलेली क्रेन ताब्यात घेतली.शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेशकुमार संपतराव तोंडे-पाटील (रा. विठ्ठल मंदिर चौक, कदमवाडी, कोल्हापूर) यांच्या कारची कदमवाडी परिसरातून शुक्रवारी (दि. ७) चोरी झाली होती. तोंडे-पाटील यांच्या फिर्यादीनंतर गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार संदीप जाधव यांच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन चौकशी केली अता, दोन व्यक्ती क्रेनने कार घेऊन गेल्याचे समजले.क्रेनच्या मालकाचे नाव मिळताच त्याच्याकडून संशयित नामदेव महाडिक याचे नाव मिळाले. ताब्यात घेऊन अधिक चौकशीत करताच महाडिक याने कार चोरीची कबुली दिली. पोलिसांनी चोरीतील कार आणि चोरीसाठी वापरलेली क्रेन जप्त केली. पोलिस अंमलदार मिलिंद बांगर, शुभम संकपाळ, लखनसिंह पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.बंद कारवर नजरफिर्यादी तोंडे-पाटील यांची कार गेल्या वर्षभरापासून एकाच ठिकाणी लावून होती. बंद अवस्थेत असलेली कार पाहून नामदेव महाडिक याने पार्टसाठी तिची चोरी करण्याचे नियोजन केले. कदमवाडीतून नागाळा पार्कात कार आणण्यासाठी क्रेनचालकास दीड हजार रुपये भाडे दिले. पार्ट काढून घेतल्यानंतर पुन्हा कार मूळ जागेवर सोडण्याचे ही नियोजन त्याने केले होते, अशी माहिती निरीक्षक सिंदकर यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस