महामार्ग सहापदरीकरणाबाबत किणी येथे पालकमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST2021-06-01T04:18:08+5:302021-06-01T04:18:08+5:30

किणी हे महामार्गलगत व मोठ्या लोकसंख्यचे गाव असूनसुद्धा चौपदरीकरणावेळी सेवा मार्ग केले नसल्यामुळे अनेकांना अपघातास सामोरे जावे ...

Statement to the Guardian Minister at Kini regarding highway co-ordination | महामार्ग सहापदरीकरणाबाबत किणी येथे पालकमंत्र्यांना निवेदन

महामार्ग सहापदरीकरणाबाबत किणी येथे पालकमंत्र्यांना निवेदन

किणी हे महामार्गलगत व मोठ्या लोकसंख्यचे गाव असूनसुद्धा चौपदरीकरणावेळी सेवा मार्ग केले नसल्यामुळे अनेकांना अपघातास सामोरे जावे लागत असल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा मार्ग करण्यात यावे व चौपदरीकरण करताना पाणी निचऱ्याच्या नैसर्गिक ओघळी बुजविण्यात आल्याने महामार्गाच्या लगतच्या जवळपास २०० एकर शेतामध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने शेतकऱ्यांना नाफिकीला सामोरे जावे लागत असून, आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला पाणी निचऱ्यासाठी उपाययोजना करण्यात यावे. शालेय विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी किणी हायस्कूलसमोर छोटा भुयारी मार्ग करावा, महामार्गाच्या पलीकडे पश्चिमेला शेतीच्या पाणीपुरवठा पाईपलाईन नेण्यासाठी टोल नाक्याजवळपास भुयारी मार्ग करण्यात यावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन या वेळी देण्यात आले.

या वेळी किणी गावचे नेते संजय पाटील, वारणा दूध संघाचे संचालक अँड. एन. आर. पाटील, माजी सरंपच बाळासाहेब पाटील, उपसरपंच अशोक माळी, सुनील समुद्रे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

३२ किणी

महामार्ग सहापदरीकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतेज पाटील याना किणी येथे ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. या वेळी आमदार राजूबाब आवळे, उद्योगपती संजय पाटील, बाळासाहेब पाटील, अशोक माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Statement to the Guardian Minister at Kini regarding highway co-ordination