शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

सासुरवास नको गं बाई.. त्रासाने जीव दमला गं बाई; कोल्हापुरात राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीत महिलांची कैफियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 13:27 IST

कोल्हापूर : पती-पत्नी आयटीत कामाला, एकमेकांवर जीवापाड प्रेम.. पण मुलाचे आई-वडील लग्न मोडण्यासाठी टपून बसलेत, पालकांच्याच विरोधात मुलावर तक्रारीची ...

कोल्हापूर : पती-पत्नी आयटीत कामाला, एकमेकांवर जीवापाड प्रेम.. पण मुलाचे आई-वडील लग्न मोडण्यासाठी टपून बसलेत, पालकांच्याच विरोधात मुलावर तक्रारीची वेळ, बाहेरख्याली पती नांदवायला तयार नाही, मला फक्त मुलं हवी आहेत, गेली १५ वर्षे मी नवऱ्याचा छळ सहन केला आता माझी, मुलांची त्याच्यापासून सुटका करून द्या, दीड वर्षापूर्वी लग्न झालेल्या उच्चपदस्थ तरुणीवर सासरच्यांविरोधात तक्रार करण्याची वेळ आली, मी लव्ह मॅरेज करून फसले, आता नांदायचे नाही, मी माझे करिअर करेन.. या कैफियती आणि दाहक वास्तव आहे राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीतील. हे ऐकताना राग, दुख, वेदना, सहनशिलता, संयम, लढा, संघर्ष, तळतळ, कणखरपणा अशा भावनांचा कल्लोळ डोळ्यातून बाहेर पडणाऱ्या आसवांमधून व्यक्त हाेत होता.प्रत्येक महिला पती, सासू, सासरे, सासरची मंडळी यांच्याकडून कधी नीट वागत नाही म्हणून, कधी संपत्तीसाठी, कधी मुलांच्या ताब्यासाठी, स्वत:च्या आत्मसन्मानासाठी, करीअरसाठी, व्यसनी पतीच्या त्रासापासून मोकळं होण्यासाठी, पतीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून, पुरुषप्रधान संस्कृतीच्या उंबऱ्याची चौकट मोडण्यासाठी, त्या धुसमटीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत होती. प्रत्येकीची कहाणी वेगळी पण सोसत असलेल्या चटक्यांची जाणीव मात्र समान. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. त्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात झालेल्या जनसुनावणीतील हे चित्र होते.सकाळी दहा वाजल्यापासून महिला येथे न्यायाच्या अपेक्षेने आल्या होत्या. त्यांची तक्रार ऐकून घेण्यासाठी शासकीय अधिकारी, स्वयंसेवक, समुपदेशक, वकील व पोलीसांचे असे चार पॅनेल बनवले होते. प्रत्येक पॅनेलसमोर महिला तिची व्यथा सांगत होती. दुपारी अडीच वाजेपर्यंत चाललेल्या या जनसुनावणीत काही प्रकरणात तडजोडी झाल्या, काही प्रकरणे भरोसा सेलकडे वर्ग केले गेले. काही प्रकरणात नोटीस तर काही प्रकरणात थेट गुन्हे नोंदवण्याच्या सूचना चाकणकर यांनी केल्या.

महिलेला भोवळ, पुरुषाला फीटआपली तक्रार नोंदवताना एका ग्रामीण भागातून आलेल्या महिलेला भोवळ आली, पाच दहा मिनिटांनी त्या शुद्धीत आल्या. तर बाहेर नोंदणी टेबलवर खेबवडे येथून आलेल्या एका पुरुषाला फिट आली. शासकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने या दोघांसाठी रुग्णवाहिका मागवली.

२० प्रकरणात समझोतागेल्या काही महिन्यांपासून समुपदेशात असलेल्या २० प्रकरणांमध्ये यावेळी तडजोड झाली. जिल्हा प्रशासनाने या जोडप्यांना एकमेकांना गुलाबाचे फूल द्यायला लावले तसेच त्यांचा सत्कार केला.

उच्चशिक्षित तरुणीही कचाट्यातउच्चभ्रू कुटुंब, उच्चशिक्षित, आणि मोठ्या पगारावर, पदावर काम करणाऱ्या २०-२५ वर्षाच्या तरुणीही सासुरवासाच्या कचाट्यात आल्याचे शुक्रवारी जाणवले. नवऱ्याची साथ आहे पण सासरच्या मंडळींचा जाच आहे, वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केले आता प्रेमाची वीण उसवली, सततच्या टोमण्यांनी, सीसीटीव्हीसारख्या बोचक नजरा नकोशा झाल्या अशा तक्रारी घेऊन तरुणी आल्या होत्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRupali Chakankarरुपाली चाकणकरWomenमहिला