राज्याला मिळणार नवे २,८९२ आरोग्य अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST2020-12-05T04:57:36+5:302020-12-05T04:57:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेतलेल्या एक्झिट एक्झाममध्ये राज्यातील २,८९२ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. ...

The state will get 2,892 new health officers | राज्याला मिळणार नवे २,८९२ आरोग्य अधिकारी

राज्याला मिळणार नवे २,८९२ आरोग्य अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेतलेल्या एक्झिट एक्झाममध्ये राज्यातील २,८९२ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांची १५ हून अधिक जिल्ह्यात आरोग्य उपकेंद्रांवर नियुक्ती करण्यात येणार आहेत. येत्या आठवड्यात नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रांवर समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. १५ जिल्ह्यांमधील याबाबतची प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. आता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी तीन टप्प्यात परीक्षा घेण्यात आली. अंतिम लेखी परीक्षेसाठी ३,०५१ उमेदवार बसले होते. त्यातील २,८९२ जण उत्तीर्ण झाले आहेत. गुणवत्तेनुसार त्यांची समुपदेश तत्त्वानुसार उपकेंद्रांवर नियुक्ती करायची आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य उपसंचालक सदस्य, तर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक समितीचे सचिव राहणार आहेत. १० डिसेंबरपर्यंत नव्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी रुजू व्हायचे आहे.

---------------------------

तीन वर्षे सेवा न केल्यास १ लाख रुपये दंड

या उमेदवारांना सहा महिने नाशिक येथे प्रशिक्षण देण्यात आले. त्यात त्यांना प्रतिमहिना १० हजार रुपये विद्यावेतन दिले. नियुक्ती झाल्यानंतर कराराप्रमाणे जिल्ह्यात ३ वर्षे सेवा न केल्यास आरोग्य अधिकाऱ्यांना १ लाख ३ हजार रुपये दंड करण्यात येणार आहे.

Web Title: The state will get 2,892 new health officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.