चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघातर्फे २७ जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलन : भाऊसाहेब पठाण : मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST2021-01-08T05:20:06+5:302021-01-08T05:20:06+5:30

कोल्हापूर : राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २७ ते २९ जानेवारीदरम्यान राज्यव्यापी आंदोलन व ...

State-wide agitation on behalf of Class IV Employees Federation from January 27: Bhausaheb Pathan: Govt will pay attention to demands | चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघातर्फे २७ जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलन : भाऊसाहेब पठाण : मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार

चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघातर्फे २७ जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलन : भाऊसाहेब पठाण : मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार

कोल्हापूर : राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २७ ते २९ जानेवारीदरम्यान राज्यव्यापी आंदोलन व संप पुकारण्यात आल्याची माहिती राज्य सरकारी गट ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण व उपाध्यक्ष रमेश भोसले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. याअंतर्गत २७ तारखेला कर्मचारी काळ्या फिती लावून काम करतील. २८ तारखेला जेवणाच्या सुटीच्या वेळेत निदर्शने व २९ तारखेला लाक्षणिक संप करण्यात येणार आहे.

पठाण म्हणाले, चतुर्थश्रेणी कामगारांसाठीचे हा एकमेव महासंघ असून राज्यातील सर्व स्थानिक कर्मचारी संघटना महासंघाशी संलग्न आहेत. संघाच्या २१ नोव्हेंबरला झालेल्या राज्य कार्यकारिणी सदस्यांच्या सभेत कर्मचाऱ्यांचा उद्रेक पाहता, प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीन दिवस आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्ग चारची पदे निरसित करू नयेत, शासकीय कार्यालयांचे खासगीकरण रद्द करा, अनुकंपा भरती विनाअट करावी, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या एका पाल्यास शासन सेवेत सामावून घ्यावे, रिक्त पदे सरळ सेवेने भरावीत, वेतनत्रुटीसंदर्भात खंड २ च्या अहवालाची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदाेलन केले जात आहे.

यावेळी कार्याध्यक्ष शिवाजी निकम, सरचिटणीस महेश पाटील, कृष्णा नाईक, संध्या गायकवाड, कांचन शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

--

Web Title: State-wide agitation on behalf of Class IV Employees Federation from January 27: Bhausaheb Pathan: Govt will pay attention to demands