अतिग्रेमध्ये आजपासून राज्य शूटिंगबॉल स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:03 IST2021-02-05T07:03:52+5:302021-02-05T07:03:52+5:30
जयसिंगपूर : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठ आयोजित राज्य शूटिंगबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व कोल्हापूर जिल्हा शहरी व ...

अतिग्रेमध्ये आजपासून राज्य शूटिंगबॉल स्पर्धा
जयसिंगपूर : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठ आयोजित राज्य शूटिंगबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व कोल्हापूर जिल्हा शहरी व ग्रामीण शूटिंगबॉल असोसिएशनच्यावतीने राज्य शूटिंगबॉल निवड स्पर्धा आज, शुक्रवारपासून सुरू होत आहेत. या स्पर्धा ३१ जानेवारीअखेर होणार आहेत, अशी माहिती शूटिंगबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर यांनी दिली. या स्पर्धेसाठी राज्यातील जिल्हा संघ मुले, मुली सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी ३०० खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये जे खेळाडू खेळतील त्यांची निवड गाझियाबाद येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहेत. स्पर्धेचे आयोजन उद्योगपती संजय घोडावत व सीईओ विनायक भोसले यांच्या सहकार्याने पार पडणार असल्याचे नांद्रेकर यांनी सांगितले. यावेळी आर. वाय. पाटील, राजेंद्र झेले, राजेश झंवर, अभिजित कोंडे, राजू नरदे, विशाल लिगाडे, सदाशिव माने, पाप्पा मालू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.