आजऱ्यात ८ जानेवारीपासून राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव
By Admin | Updated: December 29, 2014 00:21 IST2014-12-29T00:18:06+5:302014-12-29T00:21:34+5:30
या नाट्यमहोत्सवात कौटुंबिक, सामाजिक, समांतर रंगभूमी अशा सर्व नाट्यप्रकारांचा समावेश

आजऱ्यात ८ जानेवारीपासून राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव
आजरा : आजऱ्याचे ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक कै. रमेश टोपले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवनाट्य मंडळ, आजरा यांच्यावतीने ८ ते १४ जानेवारी २०१५ अखेर राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. सुधीर मुंज यांनी पत्रकार परिषदेत दिली.या नाट्यमहोत्सवात कौटुंबिक, सामाजिक, समांतर रंगभूमी अशा सर्व नाट्यप्रकारांचा समावेश आहे. नाट्यमहोत्सवामध्ये महाराष्ट्रातील नामांकित ७ हौशी नाट्यसंस्था सहभागी होणार आहेत.
स्पर्धेत सहभागी नाटके व कंसात संस्था - गुरुवार (दि. ८) - शांतता कोर्ट चालू आहे (समाराधना संस्था, सोलापूर), शुक्रवार (दि. ९)- सुखाशी भांडतो आम्ही (सिद्धांत संस्था, कुडाळ), शनिवार (दि. १०)- लोककथा ७८ (संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ), रविवार (दि. ११) -नटसम्राट (सुगुन संस्था, कोल्हापूर), सोमवार (दि. १२) - आर्य चाणक्य (अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर सांगली), मंगळवार (दि. १३) - तरपण (अखिल भारतीय नाट्य परिषद सांगली), बुधवार (दि. १४)-लेकरू उदंड झाली (बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ) हे नाट्यप्रयोग दररोज सायंकाळी ठीक ७ वाजता आजरा हायस्कूलच्या खुल्या रंगमंचावर सादर होणार आहेत. गुरुवारी (दि. ८) सायंकाळी ७ वाजता ज्येष्ठ मराठी चित्रपट कलाकार भालचंद्र कुलकर्णी यांच्याहस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होईल. विजेत्या संघाचा कै. रमेश टोपले स्मृतिचषक देऊन गौरव करण्यात येणार आहे. नवनाट्य मंडळाचे अध्यक्ष अशोक चराटी यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यमहोत्सव समितीची स्थापन केली आहे.