हरळी येथे राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यवाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:23 IST2021-01-21T04:23:34+5:302021-01-21T04:23:34+5:30

स्पर्धेत प्रसाद कोचरेकर (मुंबई) यांनी 'अरे माणसा..माणसा..आधी माणूस बन', प्रवीण पिसे यांनी 'ज्ञानमंदिर', वडकशिवालेच्या समृद्धी पाटील यांनी 'तृतीयपंथी', कोल्हापूरच्या ...

State-level online poetry reading at Hurley | हरळी येथे राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यवाचन

हरळी येथे राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यवाचन

स्पर्धेत प्रसाद कोचरेकर (मुंबई) यांनी 'अरे माणसा..माणसा..आधी माणूस बन', प्रवीण पिसे यांनी 'ज्ञानमंदिर', वडकशिवालेच्या समृद्धी पाटील यांनी 'तृतीयपंथी', कोल्हापूरच्या ऊर्मिला तेली यांनी 'सावित्रीमाता', मुंबईच्या निर्मला शेवाळे यांनी 'तीळगूळ घ्या, गोड गोड बोला'. रावसाहेब मुरगी (मुत्नाळ) '२०२० वर्ष',

वंदना कुलकर्णी (बाशी) यांनी 'ऑनलाईन शिक्षण, फळा आणि खडू लागलेत रडू, विचारित होते प्रश्न शाळा कधी सुरू ?’, सुळकूडच्या वेदिका बाळण्णा यांनी 'पूर्णान्न'. नांदेडच्या सूर्यभान खंदारे 'अरे माणसा जिद्द बाळग अंगी', मारोती रायमूल (बुलडाणा) 'परक्याचे धन', नीळकंठ कुराडे (नूल) 'प्राणप्रिय शाळा' यांच्यासह पूजा पोवार, विद्या पाटील, आशिया खलिफ, आरती लाटणे, व्ही. जी. सुतार, संतोष आंबी, ना. धों. महानोर यांनी कविता सादर केल्या.

उपमुख्याध्यापक संभाजी कार्वेकर यांनी स्वागत केले. अशोक पाटील यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र शेलार यांनी आभार मानले.

Web Title: State-level online poetry reading at Hurley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.