शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरसह राज्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:56 IST

समीर देशपांडे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या एक्झिट एक्झाममध्ये राज्यातील २८९२ ...

समीर देशपांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या एक्झिट एक्झाममध्ये राज्यातील २८९२ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या सर्वांची आता राज्यातील १५ हून अधिक जिल्ह्यांत आरोग्य उपकेंद्रांवर नियुक्ती करण्यात येणार आहेत. यासाठी येणाऱ्या आठवड्यात नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रांवर समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. १५ जिल्ह्यांमधील याबाबतची प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. आता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी तीन टप्प्यांत परीक्षा घेण्यात आली. सुरुवातीला बहुपर्यायी प्रश्न, नंतर सहा महिन्यांचे नाशिक येथे प्रशिक्षण आणि नंतर लेखी परीक्षा हे तीन टप्पे होते. या अंतिम लेखी परीक्षेसाठी राज्यातील ३०५१ उमेदवार बसले होते. त्यातील २८९२ जण उत्तीर्ण झाले आहेत.

या सर्वांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून गुणवत्तेनुसार त्यांची समुपदेश तत्त्वानुसार उपकेंद्रांवर नियुक्ती करायची आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य उपसंचालक सदस्य तर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक समितीचे सचिव राहणार आहेत. समुपदेशनाच्या एक दिवस आधी गुणवत्ता यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १० डिसेंबरपर्यंत या नव्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी रूजू व्हायचे आहे.

चौकट

तीन वर्षे सेवा न केल्यास १ लाख रुपये दंड

या उमेदवारांना सहा महिने नाशिक येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यादरम्यान त्यांना प्रतिमहिना १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात आले आहे. त्यामुळे या प्रक्रियेनुसार नियुक्ती झाल्यानंतर कराराप्रमाणे जर जिल्ह्यात ३ वर्षे सेवा केली नाही तर अशा आरोग्य अधिकाऱ्यांना १ लाख ३ हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. तसे करारनाम्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.