राज्य सरकारला याची जबर किंमत मोजावी लागेल : घाटगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:25 IST2021-05-06T04:25:17+5:302021-05-06T04:25:17+5:30
: सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द करण्यात आले. याचाच अर्थ महाविकास आघाडीचे सरकार न्यायालयात बाजू मांडण्यात पूर्णपणे अपयशी ...

राज्य सरकारला याची जबर किंमत मोजावी लागेल : घाटगे
: सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द करण्यात आले. याचाच अर्थ महाविकास आघाडीचे सरकार न्यायालयात बाजू मांडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्याचाच हा परिणाम आहे. यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. याची किंमत महाविकास आघाडी सरकारला मोजावी लागेल. असा इशारा राजर्षी शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सामाजिक आणि आर्थिक मागास असल्याच्या निकषावर मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आले होते. अपघाताने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारला न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यात सातत्याने अपयश आले आहे. एक वेळ तरी सुनावणीच्या वेळी चांगले वकील ही उपस्थित ठेवले नव्हते परिणामी सुनावणी पुढे गेली होती.मराठा समाज ही बाब विसरलेला नाही. राज्य सरकारचा खेळ होत असला तरी यामध्ये मराठा समाजाचा जीव जात आहे.. आता कोविडचा काळ आहे. त्यामुळे शांत राहणे हा एकच पर्याय आहे. भविष्यात कोविड संपताच सरकार विरोधात मराठा समाजास रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय असणार नाही. असे घाटगे यांनी म्हटले आहे.