एकनाथ नाईक, रोहित कांबळे यांना राज्य शासनाचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:29 IST2021-08-19T04:29:20+5:302021-08-19T04:29:20+5:30

कोल्हापूर : राज्य शासनाकडून दिला जाणारा २०१९ सालातील शासकीय गटातील राज्यस्तरीय केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार कोल्हापूर विभागीय ...

State Government Award to Eknath Naik, Rohit Kamble | एकनाथ नाईक, रोहित कांबळे यांना राज्य शासनाचा पुरस्कार

एकनाथ नाईक, रोहित कांबळे यांना राज्य शासनाचा पुरस्कार

कोल्हापूर : राज्य शासनाकडून दिला जाणारा २०१९ सालातील शासकीय गटातील राज्यस्तरीय केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातील छायाचित्रकार रोहित बापू कांबळे यांना तसेच पत्रकार एकनाथ नाईक यांना ग. गो. जाधव उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख ५१ हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एकनाथ नाईक यांनी वर्षभरात केलेल्या विविध विषयांवरील वार्तांकनासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. नाईक हे गोठे (ता.पन्हाळा) येथील आहेत. रोहित कांबळे यांनी २०१९ साली कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचे हेलिकॉप्टरमधून केलेले छायाचित्रण व इतर विकासात्मक उल्लेखनीय छायाचित्रांची दखल पुरस्कारासाठी घेण्यात आली.

---

फोटो नं १८०८२०२१-कोल-एकनाथ नाईक-रोहित कांबळे,

--

Web Title: State Government Award to Eknath Naik, Rohit Kamble