राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा जळगाव, सांगली, सिन्नरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:12 IST2021-02-05T07:12:37+5:302021-02-05T07:12:37+5:30
यात किशोर गटाची ५ ते ८ मार्च दरम्यान जळगावला , तर कुमार गटाची १६ ते १९ मार्च दरम्यान सांगलीला ...

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा जळगाव, सांगली, सिन्नरमध्ये
यात किशोर गटाची ५ ते ८ मार्च दरम्यान जळगावला , तर कुमार गटाची १६ ते १९ मार्च दरम्यान सांगलीला व पुरुष व महिला खुल्या गटाची कबड्डी स्पर्धा १ ते ४ एप्रिल दरम्यान सिन्नर (नाशिक) येथे होणार आहे. कुमार गटातील खेळाडूंसाठी ३१ मार्च २००१ किंवा त्यानंतरचा आणि किशोर गटासाठी ३१ मार्च २००५ किंवा त्यानंतरचा जन्म व वजनाचा निकष निर्धारित करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेचे सरकार्यवाह ॲड. आस्वाद पाटील यांनी दिली. आता जिल्हावार निवड चाचणी स्पर्धा होऊन राज्य स्पर्धेसाठी संघ पाठविले जाणार आहेत.
चौकट
कुमार गटासाठी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनने गुडाळेश्वर क्रीडा मंडळ, गुडाळ, तर किशोर गटासाठी महागावचा कबड्डी संघ निवड चाचणीतून स्पर्धेसाठी निवडला आहे.