पोलीस भरती प्रक्रिया सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST2021-07-09T04:17:07+5:302021-07-09T04:17:07+5:30

कोल्हापूर : गेली तीन वर्षे रखडलेली राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया तातडीने सुरू ...

Start the police recruitment process | पोलीस भरती प्रक्रिया सुरू करा

पोलीस भरती प्रक्रिया सुरू करा

कोल्हापूर : गेली तीन वर्षे रखडलेली राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केली आहे. याबाबत त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र पाठविले आहे.

गेली अनेक वर्षे ग्रामीण भागातील युवक या भरतीसाठी तयारी करीत आहेत; परंतु ही प्रक्रियाच रखडल्याने त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. उमेदीची वाया जाणारी वर्षे, वाढते वय, सरावामध्ये सातत्य राखण्यात येणाऱ्या विविध मर्यादा, आर्थिक अडचण त्यामुळे हे युवक नैराश्यामध्ये अडकले आहेत. या सर्वांना दिलासा देण्यासाठी ही भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असे निवेदनामध्ये म्हटले आहे.

Web Title: Start the police recruitment process