पन्हाळगड पर्यटकांसाठी सुरू करा, राष्ट्रीय बहुजन महासंघाचे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 14:32 IST2021-07-12T14:20:19+5:302021-07-12T14:32:51+5:30
Tourism Panhala Fort Kolhapur : पर्यटकांवर अवलंबून असणाऱ्या किल्ले पन्हाळागडावरील छोटे व्यावसायिक आणि किल्ले पन्हाळगड मार्गदर्शक (गाईड) यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, यासाठी पन्हाळा येथे सोमवारी सकाळी सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पन्हाळा पर्यटकांसाठी खुला करा या मागणीसाठी सोमवारी सकाळी राष्ट्रीय बहुजन महासंघाने जकात नाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे पन्हाळ्यावर येणाऱ्या वाहनांची रांग बुधवार पेठेपर्यंत लागली होती. त्यांचे निवेदन मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी स्विकारले.
पन्हाळा : पर्यटकांवर अवलंबून असणाऱ्या किल्ले पन्हाळागडावरील छोटे व्यावसायिक आणि किल्ले पन्हाळगड मार्गदर्शक (गाईड) यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, यासाठी पन्हाळा येथे सोमवारी सकाळी सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
येथील छोट्या व्यवसायिंकाच्या उपासमारीला स्थानिक प्रशासन जबाबदार असून पन्हाळगड लवकरात लवकर पर्यटकांसाठी सुरू करावा या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांना देण्यात आले. सकाळी जकात नाका परिसरात झालेल्या सुमारे दीड तासाच्या या आंदोलनामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची वाहने एका जागीच ठप्प झाली होती. यामुळे पन्हाळ्यावर शासकीय कार्यालयात वेळेत उपस्थित राहता न आल्यामुळे त्यांची चांगलीच गोची निर्माण झाली होती. निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष राजीव सोरटे, उपाध्यक्ष तुकाराम कांबळे, संदीप कांबळे, शितल गवंडी, अर्जुन कासे, मारुती माने, प्रकाश राऊत शहाबाज मुजावर, शक्ती सोरटे, सचिन कासे, केवल कांबळे, प्रवीण शिंदे, कुलदीप बच्चे, शशिकांत बच्चे, संग्राम बनकर,सर्जेराव पाटील, भगवान भाकरे, माजी नगरसेवक रवींद्र धडेल, पोलीस निरीक्षक ए. डी. फडतरे आदी उपस्थित होते.
वाहनांची लागली रांगा
या आंदोलनामुळे पन्हाळ्यावर येणाऱ्या वाहनांची रांग बुधवार पेठेपर्यंत लागली होती. यामुळे वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती.