शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर ते अयोध्या, कटियार गाड्या सुरु करा, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 16:29 IST

सह्याद्रीचा ‘ट्रेन ऑन डिमांड’ दर्जा कमी करा

कोल्हापूर : कोल्हापूर ते अयोध्या तसेच कोल्हापूर ते कटियार या नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी गुरुवारी पुण्यात झालेल्या पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा अध्यक्ष होते.या बैठकीत पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती तसेच मुंबई झोन सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी कोल्हापूर आणि सांगली दरम्यान रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडल्या. कोल्हापूर येथे नव्याने सुरू झालेल्या उच्च न्यायालयाच्या कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी विशेष मुद्दे उपस्थित करण्यात आले.सातारा आणि सोलापूर मार्गावर इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे उच्च न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांना सकाळी आपल्या जिल्ह्यातून निघून संध्याकाळी परत घरी जाणे शक्य होणार असून न्यायालयाच्या वाढत्या गरजांची पूर्तता होईल, याकडे लक्ष वेधण्यात आले.सह्याद्रीचा ‘ट्रेन ऑन डिमांड’ दर्जा कमी कराकोल्हापूर–पुणे विद्युतीकरण तसेच मिरज–पुणे दुहेरीकरण पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील सर्व गाड्यांचा प्रवासकाल कमी व्हावा, कोल्हापूर–पुणे मार्गावरील सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत पुढे नेण्याची तसेच तिचा ‘ट्रेन ऑन डिमांड’ दर्जा कमी करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना जादा तिकीट दरांपासून दिलासा मिळणार आहे.पादचारी पुलाची मागणीरेल्वे स्थानकातून ये–जा करणाऱ्या प्रवाशांना एसटी स्टँड व राजारामपुरीकडे जाण्यासाठी पादचारी पुलाची तसेच अमृत भारत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात या पादचारी पुलाच्या कामाबाबत सकारात्मक विचारविनिमय करण्यावर भर देण्यात आला.

छत्रपती राजर्षी शाहू टर्मिनस येथे अमृत भारत योजनेंतर्गत सुरू असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी पूर्णतः उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. –शिवनाथ बियाणी, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती पुणे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur-Ayodhya, Katihar Trains Demand Raised at Pune Railway Meeting.

Web Summary : Demands for Kolhapur-Ayodhya and Kolhapur-Katihar trains were raised at Pune Railway meeting. Intercity express on Satara-Solapur route was requested. Upgrades and pedestrian bridge construction were also discussed.