शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

कोल्हापूर-तिरूपती विमानसेवेला जल्लोषी वातावरणात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:26 IST

कोल्हापूर : ढोल-ताशा, लेझीम पथक वाद्यांसह कोल्हापुरी पद्धतीचा मराठमोळा बाज अशा वातावरणात रविवारी कोल्हापूर-तिरूपती आणि कोल्हापूर-हैदराबाद या मार्गांवर इंडिगो ...

कोल्हापूर : ढोल-ताशा, लेझीम पथक वाद्यांसह कोल्हापुरी पद्धतीचा मराठमोळा बाज अशा वातावरणात रविवारी कोल्हापूर-तिरूपती आणि कोल्हापूर-हैदराबाद या मार्गांवर इंडिगो कंपनीद्वारे विमानसेवा सुरू केली. कोल्हापूर-तिरूपती मार्गावरील ‘फर्स्ट फ्लाईट’ला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ती ‘फुल्ल’ होती. विमानाचे उड्डाण झाल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला.कोल्हापूरहून तिरूपती देवदर्शनला जाणाºया भाविकांची संख्या मोठी आहे. त्याचा विचार करून ‘इंडिगो’द्वारे ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर या मार्गावर अलायन्स एअर कंपनीने दि. ९ डिसेंबरपासून सेवा सुरू केली. ही सेवा नियमितपणे सुरू आहे. त्यापाठोपाठ आता रविवारपासून ‘इंडिगो’कडून हैदराबाद-कोल्हापूर आणि कोल्हापूर-तिरूपती मार्गांवर रोज विमानसेवा सुरू केली आहे. विमानतळाबाहेर प्रवाशांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात व लेझीमच्या निनादात करण्यात आले. कंपनीचे कर्मचारी डोक्यावर कोल्हापुरी फेटा परिधान करून, तर महिला कर्मचारी डोक्यावर फेटा व नऊवारी साडी नेसून मराठमोळ्या गणवेशात प्रवाशांच्या स्वागतासाठी सज्ज होते. सकाळी ९ वाजता हैदराबादहून सुमारे ६५ प्रवासी घेऊन ‘इंडिगो’ कंपनीचे विमान कोल्हापूर विमानतळावर आले. विमानतळावर भारतीय तिरंगा आणि इंडिगो कंपनीचा निळा झेंडा दाखवत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या कोल्हापूर-तिरूपती विमानसेवेला ग्रीन सिग्नल दिला. सकाळी ९.४५ वाजता ६५ प्रवासी घेऊन त्या विमानाने तिरुपतीच्या दिशेने उड्डाण केले.तिकीट दरइंडिगो’ कंपनीने कोल्हापूर-हैदराबाद विमानसेवेसाठी १९९९ रुपये तिकीट बुकिंग दर आकारला आहे, तर कोल्हापूर ते तिरूपती सेवेसाठी २४९९ ते ३०७७ रुपये तिकीट दर आकारणी केला आहे तर तिरूपती-कोल्हापूरसाठीही हाच दर असेल.