शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी’ विद्यार्थ्यांना फ्री शिप, स्कॉलरशिप सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘बीबीए’, ‘बीसीएस’, ‘एमबीए’ अभ्यासक्रम शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना फ्री शिप व स्कॉलरशिप सुरू करा, अशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘बीबीए’, ‘बीसीएस’, ‘एमबीए’ अभ्यासक्रम शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना फ्री शिप व स्कॉलरशिप सुरू करा, अशी मागणी ओबीसी जनमोर्चा पुरस्कृत ओबीसी सेवा फाउंडेशनच्या वतीने सोमवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.

व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या बहूजन कल्याण विभागामार्फत ओबीसी, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फ्री शिप, आणि स्काॅलरशिप दिली जाते. परंतु महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या ‘बीबीए’, ‘बीसीएस’, ‘एमबीए’ या सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रम शासनाने विनाअनुदान तत्त्वावर चालविण्यास महाविद्यालयांना परवानगी दिली आहे.

हे अभ्यासक्रम शिकणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १०० टक्के फ्री शिप शासन देत आहे. त्याच धर्तीवर ओबीसी प्रवर्गातील हे अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शासनाने फ्री शिप, स्काॅलर\शिप सुरू करावी. ह्या मागणीचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे वतीने आयोजित तक्रार निवारण मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांना देण्यात आले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य दिगंबर लोहार, चंद्रकांत कोवळे, किशोर लिमकर, पी. ए. कुंभार, सचिन सुतार, सुखदेव सुतार उपस्थित होते.

फोटो ओळी : शिवाजी विद्यापीठ येथे सोमवारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या तक्रार निवारण मेळाव्यात ओबीसी विद्यार्थ्यांंना फ्री शिप व स्कॉलरशिप सुरू करण्याची मागणी करण्यात आली. (फोटो-२५०१२०२१-कोल-ओबीसी)