शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याणमध्ये लोकशाही दिनाच्या धर्तीवर कर्मचारी दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 12:51 IST

zp Kolhapur-जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी ज्याप्रमाणे लोकशाही दिन आहे, त्याच धर्तीवर कर्मचाऱ्यांचेही प्रश्न मार्गी लागावेत म्हणून राज्य सरकारने लोकशाही दिनाच्या धर्तीवर कर्मचारी दिन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे उपक्रम राबवणारा राज्यातील पहिलाच विभाग दरमहा आयोजनाचे वेळापत्रक तयार

कोल्हापूर: जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी ज्याप्रमाणे लोकशाही दिन आहे, त्याच धर्तीवर कर्मचाऱ्यांचेही प्रश्न मार्गी लागावेत म्हणून राज्य सरकारने लोकशाही दिनाच्या धर्तीवर कर्मचारी दिन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.समाजकल्याणमधून त्याची सुरुवात होत आहे. समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून राबविला जाणारा हा उपक्रम राबविणारा राज्यातील पहिलाच विभाग ठरला आहे. याच्या अंमलबजावणीचे परिपत्रक काढण्यात आले आहे.अधिकारी व कर्मचारी हे विविध प्रकारच्या योजना अंमलबजावणीचे काम करत असतात, मात्र कामाच्या व्यापात त्यांच्या स्वत:च्या सेवाविषयक प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. प्रश्न सुटत नसल्याने ते चिंतेत व तणावाखाली काम करताना दिसतात. याचा परिणाम प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर व गतिमानतेवर होत असतो. त्यामुळेच हे सेवाविषयक प्रश्न वेळेवर विशिष्ट कालमर्यादेत सुटण्याच्या गरजेतून कर्मचारी दिनाची संकल्पना पुढे आली.राज्यातील सहायक आयुक्त कार्यालय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचारी यांना त्यांचे प्रश्न जिल्हा, विभागीय स्तरावरील कर्मचारी दिनात उपस्थित करता येणार आहेत. सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या तक्रारींचा सुद्धा विचार होणार आहे.

पहिल्या कर्मचारीदिनी उपस्थित झालेल्या तक्रारीचे उत्तर दुसऱ्या कर्मचारी दिनापूर्वी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यास देणे बंधनकारक आहे. कर्मचाऱ्यांचा प्रश्न आयुक्तालय स्तर किंवा शासन स्तरावर असला तरी, त्यासंबंधाची निवेदने स्वीकारून शासनास सादर करावी लागतील. प्रत्यक्ष उपस्थित न राहता व्हिडीओ कॉन्फरन्सने देखील सहभागी होता येणार आहे.असे असेल कर्मचारी दिनाचे नियोजन...

  • दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी : जिल्हा व प्रादेशिक स्तर
  • दोन महिन्यातून एकदा दुसऱ्या गुरुवारी : प्रादेशिक स्तरावरील सर्व कार्यालये
  • तीन महिन्यातून एकदा तिसऱ्या गुरुवारी : राज्यस्तरीय आयुक्तालय स्तर

या प्रश्नांना असणार प्राधान्य...अग्रिमे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, गोपनीय अहवाल, पदोन्नती, मानीव दिनांक, शिस्तभंगविषयक प्रकरणे, सेवानिवृत्ती प्रकरणे, रजाविषयक प्रकरणे, हे विषय हाताळले जातील.

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर