शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पोलिस चौकीसमोर चाकूहल्ला, एकास अटक; बांबवडे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 15:47 IST

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील येथे वडापची गाडी मागे घेत असताना धक्का लागला याचा जाब विचारत असताना झालेल्या मारामारीत प्रवीण ...

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील येथे वडापची गाडी मागे घेत असताना धक्का लागला याचा जाब विचारत असताना झालेल्या मारामारीत प्रवीण गुंगा जानकर (रा. बांबवडे) यांने अचानक दीपक सर्जेराव हांडे (रा. सुपात्रे) याच्यावर चाकू हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. यांची नोंद शाहूवाडीपोलिसात उशिरा झाली आहे ही घटना सकाळी बांबवडे पोलिस चौकी समोर घडली. संशयित आरोपी प्रवीण जानकर याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसातून मिळालेली माहिती अशी: विशाल गुंगा जानकर यानी आपली ओमनी गाडी बांबवडे बसस्टॉप समोर उभा केली होती. गाडी पाठीमागे घेताना त्या गाडीचा धक्का दीपक हांडे यांना लागला. गाडी अंगावर घालतोस काय म्हणून दोघांचे किरकोळ बाचाबाची झाली. गुंगा जानकर व विशाल जानकर तसेच सुभाष हांडे, संदीप हांडे, दीपक हांडे ही दोन्हीकडील मंडळी पोलिस चौकीच्या दारात एकत्र जमा झाली होती. त्यामुळे येथे बघ्याची गर्दी झाली होती. प्रवीण गुंगा जानकर यांने याने विशाल याच्याशी बाचाबाची व भांडण का केले म्हणून अचानक पोलिस चौकीतून बाहेर पडणाऱ्या दीपक हांडे यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केला. दीपक हांडे याच्यावर धारदार शस्त्राने वार करताच दीपक हांडे खाली कोसळले. बांबवडे चौकीमध्ये कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी अविनाश जाधव, धनाजी कुंभार, प्रवीण केरलेकर यांनी धारदार शस्त्रासह आरोपीला तत्काळ ताब्यात घेतले.

यामध्ये दीपक हांडे हे पोटावर धारदार शस्त्राचा गंभीर वार झाल्याने ते जखमी झाल्याने त्यांना बांबवडे येथील प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर सीपीआर येथे पाठविण्यात आले. अधिक तपास शाहूवाडी पोलिस करीत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshahuwadi-acशाहूवाडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस