शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील एसटीची वाहतूक सलग दुसऱ्यादिवशी बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 13:39 IST

state transport kolhapur news- प्रत्येक प्रवाशाचा कोरोना अहवाल असल्याशिवाय कर्नाटक हद्दीत प्रवेश देणार नाही. अशा आडमुठ्या धोरणामुळे कोल्हापुरातून कर्नाटकात होणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाची बस वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी बंद राहिली.

ठळक मुद्देकर्नाटकातील एसटीची वाहतूक सलग दुसऱ्यादिवशी बंदच अधिकाऱ्यांशी चर्चा; परंतु तोडगा नाही

कोल्हापूर : प्रत्येक प्रवाशाचा कोरोना अहवाल असल्याशिवाय कर्नाटक हद्दीत प्रवेश देणार नाही. अशा आडमुठ्या धोरणामुळे कोल्हापुरातून कर्नाटकात होणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाची बस वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी बंद राहिली.

वाहतूक सुरू करण्यासंबंधी कर्नाटक शासनाच्या प्रतिनिधींशी महामंडळाचे अधिकारी बुधवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा करत होते. मात्र, त्यांना यात यश आले नाही. कर्नाटकातील प्रमुख शहरांना कोल्हापुरातून ३५ बस धावतात. त्या सर्व गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत. या धोरणाचा फटका बेळगावला जाणाऱ्या प्रवाशांना जास्त बसत आहे.कर्नाटकातून येणाऱ्या केएसआरटीसीच्या सर्व बस विनातपासणी कोल्हापूरसह राज्यभरात सर्वत्र फिरत आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाने अद्यापही अटकाव केलेला नाही. परंतु महाराष्ट्राच्या एस.टी. बसना कर्नाटक शासनाने अहवालाशिवाय येण्यास बंदी घातली आहे.

याबाबत बुधवारी सायंकाळी राज्य परिवहन मार्ग महामंडळाचे अधिकारी कर्नाटक शासनाच्या प्रतिनिधींशी वाहतूक सुरू करण्यासंबंधी चर्चा करीत होते. मात्र, कर्नाटक शासनाने रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातून कर्नाटकात वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिलेली नव्हती. कोल्हापुरातून बेळगाव, हुबळी, सौदत्ती, बदामी, दांडेली, बंगळुरू, धारवाड, शिमोगा आदी ठिकाणी प्रवासी वाहतूक होते.गडहिंग्लज-चंदगडची वाहतूक सुरळीत..महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील शेवटचे तालुके असणारे चंदगड, आजरा, गडहिंग्लज या गावांना कोल्हापुरातून एस.टी. बस जाण्यासाठी निपाणीतून प्रवेश दिला आहे. या बसना निपाणीत थांबा देण्यात आलेला नाही. कोल्हापुरातून सुटलेल्या एस.टी. बस विना थांबा या तीन ठिकाणी जात आहेत.

टॅग्स :state transportएसटीkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक